कोपरगाव तालुका
…या मतदार संघात जलसंधारण कामांसाठी ६.१३ कोटींचा निधी-माहिती
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव मतदार संघातील ओढे-नाले खोलीकरण व दुरुस्ती कामांकरीता निधी मिळावा यासाठी शासन दरबारी केलेल्या पाठपुराव्याची महायुती शासनाने दखल घेवून मतदार संघासाठी ६.१३ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.
पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे संरक्षण करते.जल प्रदूषण आणि आरोग्य धोके कमी करते. खर्चिक पाणीपुरवठा आणि नवीन सांडपाणी प्रक्रिया सुविधांची गरज कमी करते. जलीय वातावरणाचे आरोग्य राखत असल्याने व या वर्षी दुष्काळाची तीव्रता जास्त असल्याने त्याचे महत्व वाढले आहे या पार्श्वभूमीवर कोपरगाव तालुक्यातील २४ कामाच्या या मंजुऱ्यांना महत्व प्राप्त झाले आहे.
त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,”मतदार संघातील जल संधारणाच्या कामासाठी निधी मिळावा यासाठी शासन दरबारी सादर केलेल्या प्रस्तावास महायुती शासनाने मान्यता देताना मतदार संघातील २४ गावांतील ओढे-नाले खोलीकरण व दुरुस्ती आदी कामासाठी एकूण ६.१३ कोटी निधीस मंजूरी देण्यात येवून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
या निधीतून मतदार संघातील बोलकी (९ लक्ष ८१ हजार), ब्राम्हणगाव (२२ लक्ष ७१ हजार), धारणगाव (२७ लक्ष), चांदगव्हाण (७ लक्ष ३२ हजार), जेऊर पाटोदा (१५ लक्ष १७ हजार), करंजी (३२ लक्ष २६ हजार), खिर्डी गणेश (२० लक्ष ९२ हजार), कोकमठाण (५७ लक्ष ७१ हजार), मळेगाव थडी (३८ लक्ष ४३ हजार), मुर्शतपूर (७ लक्ष ८ हजार) सडे (२४ लक्ष १९ हजार), रवंदे (१६ लक्ष ५६ हजार), शिंगणापूर (२४ लक्ष १३ हजार), सोनारी (११ लक्ष ५ हजार), टाकळी (१० लक्ष ५० हजार), येसगाव (१२ लक्ष ६५ हजार),
नाटेगाव (७ लक्ष ५६ हजार), संवत्सर (९६ लक्ष ४८ हजार), सांगवी भुसार (५२ लक्ष ५ हजार,) माहेगव देशमुख (१८ लक्ष ५१ हजार), सुरेगाव (२१ लक्ष १८ हजार), चासनळी (९ लक्ष ९९ हजार), कोळपेवाडी (७ लक्ष ५८ हजार) व शिंगवे (६२ लक्ष ८ हजार) आदी गावांतील ओढे-नाले खोलीकरण तसेच रुंदीकरण कामांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे.
कोपरगाव मतदार संघाच्या जलसंधारणच्या कामासाठी ६.१३ कोटी निधी मंजूर केल्याबद्दल
आ.काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार,मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आभार मानले आहे.