कोपरगाव तालुका
मुलांचा मोबाईल वापर घातक-धोक्याचा इशारा
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
शाळा पातळीवर मोबाईल ही एक समस्या बनली असून विद्यार्थ्यांना ती विनाशाकडे घेऊन जात आहे.यासाठी शिक्षक-पालक यांनी अत्यंत जागरुक राहून या संकटाला सामोरे गेले पाहिजे असे आवाहन कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या.सयाजी को-हाळे यांनी कोपरगाव येथील एका कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलताना केले आहे.
महाराष्ट्र शासनाकडून १९५५ पासून हा दिवस ‘बालिका दिन’ म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली.सावित्रीबाईंना भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखले जाते.आपले पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.त्यांना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते.त्यांच्या जयंती दिनी हा दिवस नुकताच कोपरगाव येथील श्रीमान गोकुळचंद विद्यालय व कोपरगाव तालुका विधीसेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला होता त्या कार्यक्रमात ते बोलत होते.
सदर प्रसंगी कोपरगाव येथील कनिष्ठ स्तर सह दिवाणी न्या.श्रीमती स्मिता बन्सोड,कोपरगांव वकील संघाचे अध्यक्ष अॕड.मनोहर येवले,सहाय्यक सरकारी वकील अॕड.अशोक टुपके,जिल्हा न्यायालयांचे सहाय्यक सरकारी वकील अशोक वहाडणे,कोपरगांव वकील संघाच्या सदस्या अॕड.एस.एस.देशमुख,कोपरगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे,प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मिना पाटणी,उपमुख्याध्यापक रमेश गायकवाड पर्यवेक्षिका उमा रायते,विद्यार्थी,शिक्षक आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर प्रसंगी न्या.बन्सोड म्हणाल्या की,”प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन पुढे जाणाऱ्या मुलांसमोर एक मोठे ध्येय असले पाहिजे.आता नवनवीन जे गुन्हे होत आहेत त्यामध्ये अल्पवयीन मुले व मुलींचे प्रमाण जास्त असल्याचे वास्तव त्यांनी उपस्थितांसमोर मांडले असून या मुलांची होणारी आयुष्याची दुर्दशा झालेली पाहिली की मन पिळवटून निघत असल्याचे सांगीतले व ज्या समाजात आपण राहतो त्या समाजासाठी आपण काहीतरी देणे लागतो म्हणून यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न झाले पाहिजे असे आवाहन त्यांनी शेवटी केले आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्याध्यापक रमेश गायकवाड यांनी केले,तर उपस्थितांना मार्गदर्शन वकील संघाचे अध्यक्ष मनोहर येवले,अड्.अशोक वहाडणे आदींनी मार्गदर्शन केले आहे.तर सुत्रसंचालन सुरेश गोरे यांनी केले तर शेवटी उपस्थितांचे आभार रघुनाथ लकारे यांनी मानले आहे.