जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावच्या विकासाला ०२ हजार ३०० कोटींचा बूस्टर डोस-…या नेत्याची माहिती

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

आपल्या आमदारकीच्या चार वर्षाच्या काळात आपण कोपरगाव पंचायत समिती,तहसील कार्यालय फर्निचर,पोलीस ठाणे इमारत,पोलीस वसाहत,रस्ते,भूमिगत गटारी,नगरपरिषद कर्मचारी वसाहत,घाट सुशोभीकरण,उपकारागृह इमारत आदी ३०० कोटींची कामे प्रगतीपथावर असून नागरिकांसाठी महत्वपूर्ण असलेल्या साठवण तलावासह कोपरगाव तालुक्यात एकूण ०२ हजार ३०० कोटी रुपयांचा निधी मिळवला असल्याचा दावा कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी नुकताच कोपरगाव शहरातील एका कार्यक्रमात बोलताना केला आहे.

“आपल्याला मागील गणेशोत्सवात गणेश विसर्जन प्रदूषित पवित्र गोदावरी नदीत करण्यास आपण विरोध केल्याने या मुद्द्यावरून गत गणेश उत्सवात एका शहर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांने रात्रभर कारागृहात डांबून ठेवून हाणमार केली होती मात्र त्याकडे कोणीही गांभीर्याने पहिले नाही”-आदिनाथ ढाकणे,कोपरगाव.

कोपरगाव शहरास व तालुक्यात अ.नगर जिल्ह्यात क्रमांक एक बनविण्यासाठी,’संवाद कोपरगावच्या विकासाचा’ हा कार्यक्रम आज दुपारी ३.३० वाजता आ.आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत,’कृष्णाई मंगल कार्यालया’त मोठ्या उत्साहात संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.

“आ.आशुतोष काळे यांनी त्यांना मिळणाऱ्या मंत्रीपदाऐवजी कोपरगाव शहराच्या पाणी साठवण तलावाला प्राधान्य दिले हि मोठी समाधानाची बाब असल्याचे सांगून त्याच जागी त्यांचे कौतुक केले आहे.त्यांनी असेच आगामी काळात विकासाला प्राधान्य द्यावे कोपरगाव शहराला जिल्हा व्हायला वेळ लागणार नाही”-ओंमप्रकाश कोयटे,अध्यक्ष,महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन.

सदर प्रसंगी राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे,कोपरगाव नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष पद्माकांत कुदळे,विजय वहाडणे,विजय बंब,पिपल्स बँकेचे अध्यक्ष कैलास ठोळे,भाजपचे माजी अध्यक्ष विनायक गायकवाड,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगूले,व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुधीर डागा,अनिल सोनवणे,नगरपरिषदेचे माजी गटनेते विरेन बोरावके,माजी नगरसेवक राजेंद्र वाघचौरे,फकीर कुरेशी,काळे गटाचे सर्व माजी नगरसेवक,युवा आघाडीचे अध्यक्ष नवाज कुरेशी,प्रतिभा शिलेदार,महिला मंडळाच्या अध्यक्षा  आदी मान्यवरांसह बहुसंख्येने नागरिक कार्यकर्ते उपस्थित होते.

त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”कोपरगाव शहर हे मध्यवर्ती ठिकाण आहे,रेल्वे स्थानक,विमानतळ,राष्ट्रीय महामार्ग,समृद्धी महामार्ग आहेत.पण तालुका क्रमांक एकवर जायला हवा व आगामी काळात ‘तो’ जिल्हा व्हायला हवा असा आशावाद व्यक्त करून त्यांनी उपस्थित नागरिकांना त्याबाबत सूचना करण्याचे आवाहन शेवटी केले आहे.

सदर प्रसंगी बांधकाम विभागाचे अधिकारी,यांनी कोपरगाव नागरपपरिषदेच्या पूर्वेस एक कोटींचा १४ गाळ्यांचा  प्रस्ताव तयार असून त्यात अनेक व्यापारी आस्थापना तयार होणार आहे.५१६ चौरस फुटाचे गाळे प्रस्तावित असल्याची माहिती दिली आहे.सदर प्रश्नी विस्थापितांना प्राधान्य मिळेल का ? असा सवाल एका विस्थापिताने केला आहे.तर त्याच वेळी त्यांनी नागरिकांना स्वच्छता गृहाची मागणी केली आहे.तर सदर व्यापारी संकुलात पार्किंग आहे का असा सवाल सुभाष भास्कर यांनी विचारला आहे.त्यावेळी प्रत्येक गाळे धारकास ते उपलब्ध करून देणार असल्याचे माहिती प्रशासनाने दिली आहे.

महिला विकास आघाडीच्या कार्यकर्त्या विमल पुंडे यांनी महिलांना बाग-बगीचा किंवा चालण्यासाठी ट्रॅक गरजेचा असल्याचे सांगितले आहे.पाण्याचा प्रश्न निकाली काढावा अशी मागणी केली आहे.

दरम्यान श्री पाटील या महिलेने भाजी मार्केट मध्ये पार्किंग व्यवस्थेचा प्रश्न गंभीर असल्याचे सांगितले त्यावेळी आ.काळे यांनी आगामी काळात तशी व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले आहे.

शहरातील नामवंत औषध विक्रेते हेमंत चव्हाण यांनी व्यवसाय वृद्धी करण्यास काय नियोजन आहे असा सवाल केला आहे.कोपरगाव शहरात विद्युत दाहिनी बसवावी.त्यामुळे वृक्ष लागवड करण्यास व हरित कोपरगाव करण्यास मदत होईल.वहातुक कोंडी कमी करण्याचा प्रयत्न करावा अशी मागणी केली आहे.

कोपरगाव बाजार तळ येथे एक कोटींचे २४ गळ्यांचे व्यापारी संकुल प्रस्तावित असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

सदर प्रसंगी ओंमप्रकाश कोयटे यांनी,”आ.काळे यांच्या या उपक्रमाचे कौतुक करत असताना त्यांनी
विकासकामे करताना नेत्यांनी स्पर्धा करावी तरच खऱ्या अर्थाने विकास होईल पण त्यात गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावे अशी मागणी केली आहे.कोपरगाव पूर्वी महाराष्ट्राचा ‘कॅलिफोर्निया’ होता आता आपण कुठे हरवलो याचा तपास लागत नाही.दोन्ही प्रतिस्पर्धी दंड थोपटून उभे राहतात हे चित्र काही बरोबर नाही.त्याचा वाद खरा की खोटा यात आपल्याला पडायचे नाही असा रोखठोक आहेर केला आहे.आ.काळे यांनी त्यांना मिळणाऱ्या मंत्रीपदाऐवजी आपण कोपरगाव शहराच्या तलावाला प्राधान्य दिले हि मोठी समाधानाची बाब असल्याचे सांगून त्याच जागी त्यांचे कौतुक केले आहे.त्यांनी असेच आगामी काळात विकासाला प्राधान्य द्यावे कोपरगाव शहराला जिल्हा व्हायला वेळ लागणार नाही अशा आशावाद व्यक्त केला आहे.मात्र त्यांनी त्यावेळी श्रीरामपूर नगरपरिषदेच्या भूमिगत गटारीचे उदाहरण देऊन ‘त्या’ झाल्या पण त्यातून पाणी वाहीले नाही तशी अवस्था व्हायला नको असा टोला लगावला आहे.
“कोपरगाव मधील बस स्थानक परिसरात,”बांधा वापरा व हस्तांतरण करा’ या तत्वावर मोठे व्यापारी संकुल होईल पण त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.या शहराला पूर्वीचे गावाला गावपण राहिले नाही ते मिळवणे गरजचे आहे.त्यासाठी त्यांना दोन ओळीची कविता म्हणण्याचा त्यांना मोह आवरला नाही त्यासाठी त्यांनी शिघ्र कवी व माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांची हसमुखपणे परवानगी घेतली.त्यावेळी त्यांनी शहरातील कवी संमेलने बंद पडली याकडे लक्ष वेधले आहे.शहरात विकसित झालेला पोहण्याचा तलाव कोटी रुपये खर्चून अद्याप वापरात वापरात नाही याकडे लक्ष वेधून घेतले आहे.धारणगाव रस्त्यावरील ‘माधव उद्याना’चा विकास करता येईल व त्याचा लहान मुले व जेष्ठ नागरिक आदींना त्याचा उपयोग होईल.शहरात विविध छोटे छोटे व्यवसाय विकसित करता येईल व समृद्धीमार्गे ते मुंबईत काही तासात विक्रीसाठी थेट मुंबईत वेगाने पाठवता येईल अशी उपयुक्त सूचना केली आहे.दरम्यान प्रत्येक विभागनिहाय बैठकांचे वेळोवेळी आयोजन केले तर गर्दी कमी होईल व त्यांचे निरसन होण्यास मदत होईल असे आवाहन केले आहे.जाता जाता त्यांनी वारंवार ‘कोपरगाव शहर बंद’ चे फॅड बंद करता येईल का ? व्यापाऱ्यांचे त्यातून मोठे नुकसान होत असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.व याबाबत गांभीर्याने  विचार करायला हवा असे आवाहन शहरातील नागरिकांना व कार्यकर्त्याना केले आहे.दरम्यान या संवादात अनेकांना मोकळेपणाने बोलून दिल्याबद्दल बहुतेक वक्त्यांनी आ.आशुतोष काळे यांचे भरभरून कौतुक करून समाधान व्यक्त केले आहे.

“कोपरगाव बेट भागातील प्राचीन शुक्राचार्य मंदिराची उपेक्षा दूर करणे गरजेचे असून शुक्राचार्य मंदिर ट्रस्टने यापूर्वी या तीर्थक्षेत्राला राज्य व देश स्तरावर नेण्याचा प्रयत्न केला आहेच पण आगामी काळात आ.काळे यांनी गोदावरी घाट ते मंदिर परिसर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रमाणे विकसित या करावा”-बाळासाहेब आव्हाड,अध्यक्ष,शुक्राचार्य मंदिर ट्रस्ट कोपरगाव बेट.

दरम्यान कोपरगाव नगरपरिषदेचे शहर अभियंता श्री.झोपे यांनी सादरीकरण करताना सांगितले की,”शहराची लोकसंख्या ७० हजार गृहीत धरता शहरासाठी पाण्याचा तलाव,उंच टाक्या,वितरण व्यवस्था दुरुस्त करणे आदी कामे करण्यात येणार आहे.तीन-चार महिन्यात साठवण तलाव पूर्ण होणार आहे.पाच क्रमांकाचे तलावाचे काम पूर्ण करून शहराचा पाणी पुरवठा सुरू करून नंतर १-४ तलाव दुरुस्ती करणार आहे.जुलै २०२४ पर्यंत काम पूर्ण करणार असून दररोज पाणी देणार आहे.त्यास आकडेवारीला आक्षेप अनिल सोनवणे यांनी घेतला व प्रमुख काम हे केवळ काँक्रिटिकरण आहे.खोदाई २० टक्के आहे.विविध तांत्रीक उहापोह करून मंजूर कामाच्या निधीचा चांगला विनियोग व्हावा अशी मागणी केली आहे.कोपरगावच्या आमदार काळे यांनी अधिकाऱ्यांवर डोळे झाकून विश्वास ठेवू नये अशी मागणी करत अधिकाऱ्यांना सोनवणे यांनी धारेवर धरले आहे.

त्याच वेळी एका अधिकाऱ्याने कोपरगाव शहरातील सांड पाण्याचे गोदावरी नदी प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते ते टाळण्यासाठी ते प्रक्रिया करून सोडणे गरजेचे आहे.त्यासाठी भुयारी गटार योजनेचे काम होणे गरजेचे आहे.त्यासाठी आगामी काळात प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे.दरम्यान त्यावर आदिनाथ ढाकणे यांनी जोरदार हल्लाबोल करताना,”गोदावरी या पवित्र नदीत प्रदूषित पाणी सोडले जाते यावर अधिकाऱ्यांनी कॅमेऱ्यासमोर कबुली दिली असून त्याचे रेकॉर्डिंग झाल्याची आठवण करून देत त्यात नगरपरिषदेतील अधिकाऱ्यांना शिक्षा होऊ शकते असा इशारा देऊन आपण या बाबत अनेक वेळा मागणी करूनही त्याकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे.व याबाबत आपण न्याय मागून अधिकाऱ्यांची नोकरी घालवू असा दमच दिला आहे.या पूर्वी आपण गणेश उत्सवात गणेश विसर्जन थेट गटारीच्या पाण्यात होत असल्याने त्यास आक्षेप घेतला होता.आपल्या पवित्र हिंदू देवदेवतांना अशा गटारीच्या पाण्यात निरोप देणार का ? उपस्थितांना १८० अंशाच्या कोनात फिरून थेट भर सभेत सवाल केला आहे.त्यावर अनेकांनी दुर्दैवाने मौन पाळणे पसंत केले आहे.त्यात शेवट आ.काळे यांनी हस्तक्षेप करून शेवट गणपती विसर्जनासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याचे आश्वासन दिल्याने तो वाद अखेर शमला आहे.

दरम्यान आदिनाथ ढाकणे यांनी,”आपल्याला याच मुद्द्यावरून गत गणेश उत्सवात शहर पोलीस अधिकाऱ्यांनी रात्रभर कारागृहात ठेवून हाणमार केल्याचा गंभीर आरोप केला आहे.त्यावर मात्र कोणीही खुलासा केला नाही.त्यावेळी अधिकारी कोण होते ? व त्यांना कोणी असा आदेश दिला असावा अशा प्रश्नार्थक नजरेने सभागृहात पाहिले आहे.

यावेळी कोपरगाव जेष्ठ नागरिक संघाचेअध्यक्ष विजय बंब यांनी जेष्ठ नागरिकांना बाग बगीचा विकसित करावा अशी मागणी केली व त्यासाठी आपल्या मागण्यांचे निवेदन आ.काळे यांना दिले आहे.

दरम्यान व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुधीर डागा यांनी शहरातील ‘हॉकर्स’ साठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण करावी,पीपल्स बॅँकेसमोर व गुरुद्वारा समोर असलेली वाहतूक एकेरी केली तर बऱ्यापैकी वाहतूक समस्या दूर होतील.साईबाबा चौक येथे उड्डाण पूल करणे गरजेचे आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांचा व नागरिकांचा वेळ वाचेल,शहरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी विविध ठिकाणी रहदारीच्या ठिकाणी सी.सी.टी.व्ही.बसवणे गरजेचे असल्याची महत्वपूर्ण सूचना केली आहे.त्यासाठी व्यापारी महासंघ मदतीसाठी तयार असल्याचे नेहमीप्रमाणे सांगितले आहे.

दरम्यान जनता दरबार नियमित होत नसल्याने नागरिकांच्या तक्रारी जास्त दिसून आल्या असून त्यासाठी वेळोवेळी जनता दरबार होणे गरजेचे असल्याची मागणी नागरिकांनी केली आहे.मात्र या संवादाचे शहरतील नागरिकांनी जोरदार स्वागत केले आहे.व त्याबाबत आ.आशुतोष काळे यांचे जोरदार कौतुक केले आहे.

सदर प्रसंगी विवेक रत्नपारखी आदींनी जमिनीबाबत समस्या मांडल्या आहेत.


या वेळी बाळासाहेब आव्हाड यांनी,”कोपरगाव बेट भागातील प्राचीन शुक्राचार्य मंदिराची उपेक्षा दूर करण्याची मागणी केली आहे.ट्रस्टने यापूर्वी या तीर्थक्षेत्राला राज्य व देश स्तरावर नेण्याचा प्रयत्न केला आहेच पण आगामी काळात आ.काळे यांनी गोदावरी घाट ते मंदिर या दरम्यान परिसर विकास करावा अशी मागणी केली आहे.

ऍड.अशोक देशमुख यांनी नागरिकांना बंदिस्त नाट्यगृह करावे,लहान बालकांसाठी बगीचे करावे अशी सूचना केली आहे.कार्यकर्ते हिरालाल महानुभाव यांनी शिक्षण संस्थांसाठी स्वतंत्र जागा मिळावी अशी मागणी केली आहे.अशोक ढेपले यांनी,बोलताना,”ब्रिजलाल नगर मध्ये पायाभूत विकास करावा अशी मागणी केली आहे.

सदर प्रसंगी प्रास्तविक प्रशासक तथा मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी केले तर उपस्थितांचे आभार उपमुख्याधिकारी ज्ञानेश्वर चाकने यांनी मानले आहे.

(अनावधानाने कोपरगाव विकासाची रक्कम चुकली होती ती २३०० कोटी अशी वाचावी.वाचकांच्या गैरसोयीबद्दल क्षमस्व…)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close