जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

वकीलांच्या मदतीशिवाय नागरिकांना न्याय अशक्य-प्रतिपादन

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव न्यायालयात चालु असलेल्या खटल्यात वादी-प्रतीवादी किंवा फिर्यादी व आरोपीच्या वकीलाशिवाय नागरिकांना न्यायाधिश न्यायदान करू शकत नाही असे प्रतिपादन जिल्हा व सत्र न्यायाधिश एस.बी.कोऱ्हाळे यांनी कोपरगाव येथे एका कार्यक्रमात बोलतांना केले आहे.

“आदर्श वकील संघ कसा असावा हे मला कोपरगावच्या अॅडव्होकेट बारमध्ये आल्यावर कळाले,ज्युनिअर वकिलांना कोर्ट कामकाजाची जलदगतीने माहिती व्हावी,त्यांच्यात धाडस निर्माण होण्यासाठी वकील संघात चर्चासत्र आयोजित करावे”-न्या.बी.एम.पाटील,जिल्हा व सत्र न्यायाधीश,कोपरगाव.

कोपरगाव वकील संघाची निवडणूक नुकतीच मोठया उत्साहात संपन्न झाली आहे.त्यात नवनिर्वाचित अध्यक्ष अॅड. एम.पी.येवले यांचा पदग्रहण संमारंभात मोठया उत्साहात संपन्न झाला आहे त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

सदर प्रसंगी व्यासपिठावर जिल्हा व सत्र न्यायाधीश बी.एम.पाटील,दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर एस.एस.बोस, दिवाणी न्या.वरिष्ठ स्तर एम.ए.शिलार,दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर बी.डी.पंडीत,माजी अध्यक्ष अॅड.एस.पी.खामकर,नवनिर्वाचित उपाध्यक्ष अॅड.एस.डी.गव्हाणे,नवनिर्वाचित महिला उपाध्यक्ष अॅड.ज्योती भुसे,नवनिर्वाचित सचिव अॅड.दिपक पवार आदी प्रमुख मान्यवरासह दरम्यान दिवाणी न्यायाधिश एम.ए.शिलार,अॅड.व्ही.जी.सदाफळ,अॅड.पी.एम.गुजराथी,अॅड.अशोक टुपके,अॅड.जयंत जोशी,अॅड.एस.एम.वाघ,अॅड.एस.डी.कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.यावेळी, जेष्ठ विधिज्ञ अॅड.आर.टी.भवर,अॅड. सी.एम.वाबळे,अॅड.एस.व्ही. देव,अॅड.भास्कर गंगावणे,अॅड.शंतनु धोर्डे यांचेसह वकील,आप्तेष्ट,नातेवाईक उपस्थित होते.

त्यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की,”खटल्यामध्ये वकीलांकडुन खरी माहीती,पुरावे न्यायाधिशापर्यंत पोहचले तरच न्याय होतो.न्याय संस्थेवरील नागरीकांचा विश्वास दृढ होण्यासाठी न्यायाधिश व वकीलांनी काम करणे गरजेचे आहे. परंतु प्रलंबित खटले आणि न्यायाधीशांची संख्या पाहता वेळेत न्याय होत नसल्याची खंत त्यांनी शेवटी व्यक्त केली आहे.

सदर प्रसंगी माजी अध्यक्ष अॅड.खामकर यांनी त्यांच्या काळात योग्य कामकाज केले.नुतन अध्यक्ष अॅड. एम.पी. येवले यांना काम करण्यासाठी भरपुर संधी आहे.नवीन न्यायालय ईमारत चांगली कशी होईल याकडे नुतन अध्यक्षांनी लक्ष घालुन पुर्ण करून घ्यावी असे म्हणत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

सदर प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी अध्यक्ष एस.पी.खामकर यांनी केले आहे.सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी ॲड.रणजीत जावळे,ॲड.राहुल जावळे यांनी परिश्रम घेतले.तर सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अॅड. महेश भिडे यांनी केले,तर नवनिर्वाचित उपाध्यक्ष अॅड.एस.डी.गव्हाणे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close