कोपरगाव तालुकापाणी पुरवठा,स्वच्छता विभाग
कोपरगावात असाही ‘महसूल दिन’
न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगांव येथील महसूल विभागाच्या मूलभूत जबाबदाऱ्या पार पाडण्याकरिता अथक प्रयत्न करणाऱ्या अधिकारी,कर्मचाऱ्यांचा पाठीवर कौतुकाची थाप देण्याकरिता त्यांचा यथोचित सत्कार करुन त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ०१ ऑगस्ट हा महसूल दिन म्हणून साजरा केला जात असला तरी यावेळी मात्र ‘तो’वेगळ्या पद्धतीने इमारत स्वच्छता अभियान साजरा करून संपन्न होत असल्याने त्याचे वेगळेपण ठसठशीत पणे दिसत आहे.यात सर्व विभाग प्रमुखांच्या सहाय्याने स्वच्छता अभियान राबिवण्यात येत असून त्यासाठी आर्थिक तरतूद नसल्याने अधिकारी आणि कर्मचारी यांनी स्वनिधीतून हि योजना तयार केली असल्याची माहिती तहसीलदार संदीपकुमार भोसले यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
महसुली वसुलीचे उद्दिष्ट ओलांडण्याकरिता तसेच महसूल विभागाच्या मूलभूत जबाबदाऱ्या पार पाडण्याकरिता अथक प्रयत्न करणाऱ्या अधिकारी,कर्मचाऱ्यांचा पाठीवर कौतुकाची थाप देण्याकरिता त्यांचा यथोचित सत्कार करुन त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ०१ ऑगस्ट हा महसूल दिन म्हणून साजरा केला जातो.तो कोपरगाव तहसील कार्यालयात साजरा करण्यात आला आहे.मात्र यावेळी तो थोडा वेगळा आणि कार्यालय स्वच्छतेची जोड देऊन अगोदर तयारी करून साजरा करण्यात येत आहे हे त्यातील नाविन्य.
कोपरगाव तहसील कार्यलयाची जुनी इंग्रज कालीन इमारत तत्कालीन आ.अशोक काळे यांच्या कालखंडात पाडली होती.व नव्या इमारतीसाठी साधारण ०५ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली होती.त्यातून सदर इमारत सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधून पूर्ण झाल्यावर तिचे उदघाटन साधारण सन-२०१४ च्या सप्टेंबर मध्ये विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी तत्कालीन आ.अशोक काळे यांनी तिचे उदघाटन घाईघाईने केले होते.त्यासाठी कोणीही राज्यातील बडा नेता बोलावला नव्हता.आगामी काळात सत्तांतर झाले व भाजपची सत्ता आली होती त्यांनतर सदर इमारतीचे संपूर्ण तयारीनिशी साग्रसंगीत उदघाटन तसेच राहून गेले होते.(हे कोपरगावातील नेत्यांच्या सवयी पाहता आक्रितच मानले पाहिजे असो) या शिवाय फर्निचरला वेगळी आर्थिक तरतूद नव्हती ती विद्यमान आ.आशुतोष काळे यांना करावी लागली आहे हे वेगळे सांगणे न लगे.त्याचे काम वर्तमानात जोरात सुरु आहे.त्यामुळे सदर कारागिरांच्या साहित्याचा फाफट पसारा असणारच ते वेगळे सांगण्याची गरज नाही.त्यातच सदर इमारतीचा स्वच्छतेचा प्रश्न कायमच ऐरणीवर आलेला आहे.त्या स्वच्छतेसाठी माहिती अधिकार संजय काळे यांनी विविध लक्षवेधी आंदोलने करून कायम आवाज उठवला आहे.काही वेळा स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आमदारांचे लक्ष वेधून घेतले आहे.
“कोपरगाव तहसील कार्यालयाच्या स्वच्छतेसाठी स्वतंत्र तरतूद नाही त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष होत होते हे आज पर्यंतचे वास्तव आहे.मात्र आता आम्ही सर्व विभागांनी एकत्र येवून ऐच्छिक निधी स्थापन केला असून प्रतिदिन इमारत स्वच्छ ठेवण्यासाठी दोन कर्मचारी नियुक्त केले आहे व इमारत स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे”-संदीपकुमार भोसले,तहसीलदार,कोपरगाव.
वर्तमानात तहसीलदार म्हणून संदीपकुमार भोसले यांची नुकतीच बदली झाली आहे.त्यांनी आल्यावर येथील इमारतीच्या अस्वच्छतेबद्दल नाराजी व्यक्त केली होती.व स्वच्छता नसेल तर मन लावून काम कसे करू शकता ? असा सवाल कर्मचाऱ्याना विचारला आहे.व या प्रकरणी लक्ष घातले आहे.व त्यासाठी विविध शासकीय कार्यालये आदींचे प्रमुख यांची अंतर्गत बैठक बोलावून त्यांना याची जाणीव करून दिली असल्याची माहिती दिली आहे.दरम्यान त्यात त्यांनी सदर इमारत स्वच्छतेसाठी स्वतंत्र स्वनिधी तयार केला असून प्रतिदिन स्वच्छता ठेवली जाणार असल्याची माहिती दिली आहे.
कोपरगाव तहसिल कार्यालयाच्या तीन मजली ईमारतीत अंतर्गत दालने असून कृषी विभाग,सामाजिक वन विभाग,वन विभाग,कोषागार कार्यालय,दुय्यम निबंधक आदी कार्यालये स्थानापन्न आहेत.याच ईमारतीत काही महिन्यापुर्वी पंचायत समितीचे संपूर्ण कामकाज काही वर्ष सुरु होते.मात्र त्यांची इमारत पूर्ण झाल्याने ते स्थलांतरित झाले आहे.सदर इमारतीत विविध विभागाच्या अधिकारी,कर्मचारी आणि नागरिकांचा मोठा राबता असतो त्यामुळे स्वामी विवेकानंद यांच्या भाषेत भारतीय नागरिक वैयक्तिक चारित्र्याच्या तुलनेत सार्वजनिक चारित्र्याच्या बाबतीत पाश्चात्य लोकांच्या खूप मागे असून त्याचा अनुभव पावलोपावली शासकीय इमारतींसह बसस्थानकाच्या बाबतीत वारंवार येत असतो त्याला कोपरगाव तहसील कार्यालयाची इमारत अपवाद असण्याचे कारण नाही.हे देशभरात सार्वजनिक चित्र आहे.सन-२०१४ च्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच यात लक्ष घातले असल्याने बऱ्यापैकी बदल झाला आहे.पण पूर्ण म्हणावा असा नक्कीच नाही.निवडणुकीनंतर त्याचा त्रास अधिकारी आणि कर्मचारी आदींसह आपली कामे घेऊन शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना होत असतो.आता मात्र हे खरे आहे की त्याची सुरुवात झाली आहे.आगामी काळात ती किती दिवस राखली जाईल हे लवकरच समजणार आहे.तो पर्यंत तथास्तु ….!