शैक्षणिक
राष्ट्रीय पातळीवर चमकले…या संस्थेचे विद्यार्थी

न्यूजसेवा
श्रीरामपूर-(वार्ताहर)
इग्निटेड माईंड लॅब मुंबई यांचे मार्फत देश पातळीवर मेंटल मॅथस् स्पर्धा भरवल्या जात असून यावर्षी त्या स्पर्धामध्ये ‘प्राईड अकॅडमी स्कूल’च्या नऊ विद्यार्थ्यांनी देश पातळीवरील स्पर्धा जिंकली असल्याची माहिती संस्थेने दिली आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये आयेझा मौनोद्दीन पटेल,आराध्या पंकज आढाव,वेदांत दादासाहेब पवार,आशुतोष बनकर( सेकंड स्टॅंडर्ड),स्वरूपा प्रदीप उंडे,या प्रमोद पवार,प्रीत सुनील टेकाळे,ओम बाळासाहेब पवार,तनिष्का सर्जेराव पटारे आदिंचा समावेश आहे.त्यांचे संचालक ज्ञानेश्वर मुरकुटे व संस्थापक वंदना मुरकुटे आदींनी अभिनंदन केले आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील भेर्डापूर-वांगी येथे माऊली प्रतिष्ठानचे संस्थापक ज्ञानेश्वर मुरकुटे तसेच प्राईड अकॅडमीच्या संस्थापिका डॉ.वंदना मुरकुटे यांनी सुरू केलेल्या प्राईड अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये मधील ५० विद्यार्थ्यांनी ‘माईंड जिम स्पर्धेत’ दोन टप्यात सहभाग नोंदविलेला होता.
प्रथम टप्प्यात ४२ विद्यार्थी विद्यार्थ्यांचा प्रवेश झाला व द्वितीय टप्प्यात नऊ विद्यार्थ्यांनी बाजी मारत आपल्या नावावर राष्ट्रीय पदक नोंदविले आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये आयेझा मौनोद्दीन पटेल (सिनियर केजी),आराध्या पंकज आढाव (फर्स्ट स्टॅंडर्ड),वेदांत दादासाहेब पवार
(फर्स्ट स्टॅंडर्ड),आशुतोष बनकर( सेकंड स्टॅंडर्ड),स्वरूपा प्रदीप उंडे (थर्ड स्टॅंडर्ड), या प्रमोद पवार (फिफ्थ स्टॅंडर्ड),
प्रीत सुनील टेकाळे (सिक्स स्टॅंडर्ड ),ओम बाळासाहेब पवार (सिक्स स्टॅंडर्ड ),तनिष्का सर्जेराव पटारे (सेवन स्टॅंडर्ड) या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पातळीवर श्रीरामपूर तालुक्याचे नाव देशपातळीवर चमकवले आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे माऊली प्रतिष्ठानचे संचालक संस्थापक ज्ञानेश्वर मुरकुटे,संस्थापिका डॉ.वंदना मुरकुटे,स्कूल मॅनेजमेंट कमिटी,प्राचार्य प्रीती गोटे (भेर्डापूर युनिट),प्राचार्य सुरेश कोकणे(प्राईड ज्यू कॉलेज) प्राचार्य आबासाहेब घोगरे (टाकळीभान युनिट),शिक्षक,पालक आदींनी अभिनंदन केले आहे.