शैक्षणिक
बाल वयात बौद्धिक विकासाबरोबर शारीरिक विकास गरजेचा-माहिती

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
बौद्धिकता सिद्ध करताना बाल वयात शारीरिक विकास होणे जितके महत्वाचे आहे,तितकेच बाल वयात कला,गुण विकसित होणे ही काळाची गरज बनली असल्याचे प्रतिपादन प्रमुख पाहुण्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सुनिता ससाणे यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
“निवारा परिसरात विद्यार्थ्यांवर संस्कार करणाऱ्या शिक्षकांच्या सोसायट्या अधिक आहे.१९९६ साली या परिसरात विद्यालयाची स्थापना करून आज २७ वर्षे पूर्ण होत आहे.विद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकांच्या असलेल्या परिसरामुळे विद्यार्थ्यांवर संस्कार,शिस्त चांगली लागते आणि सुसंस्कृत पिढी तयार होत आहे हि समाधानाची बाब आहे”-ओमप्रकाश कोयटे,अध्यक्ष,समता चॅरिटेबल ट्रस्ट,कोपरगाव.
मुलांमध्ये बालवयापासून कलेचे संस्कार झाले तर त्यांच्यामधील सुप्त आविष्काराला संधी मिळण्याबरोबरच त्यांच्यामध्ये संगीत,नृत्य,नाट्य,चित्र,शिल्प,वास्तू यांसारख्या प्रायोगिक व दृश्यकलांचा आस्वाद आणि रसग्रहण करण्याची क्षमता वाढीस लागते.परिणामी मुले सुसंस्कारित होतात असा एक मतप्रवाह कला क्षेत्रातून व्यक्त होताना दिसतो त्यामुळे प्राथमिक शाळांत हे उपक्रम साजरे केले जात असून असाच कार्यक्रम कोपरगाव येथील निवारा उपनगरात समता चॅरिटेबल ट्रस्ट संचलित स्व.दादाप्पा खंडाप्पा कोयटे विद्यालयात नुकताच मोठया उत्साहात पार पडला आहे.त्यावेळी त्या बोलत होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानीं यशवंत आंबेडकर हे होते.
सदर प्रसंगी समता चॅरिटेबल ट्रस्ट संचलित स्व.दादाप्पा खंडाप्पा कोयटे विद्यालयाचे मुख्याध्यापक माधव पोटे,प्रा.यशवंत आंबेडकर,कोयटे विद्यालयाचे संस्थापक ओमप्रकाश कोयटे,समता इंटरनॅशनल स्कूलच्या विश्वस्त स्वाती संदीप कोयटे,रंगनाथ खानापूरे,सुरेंद्र व्यास,मीना व्यास,जोत्सना पटेल,कोयटे विद्यालयाच्या अध्यक्षा सुहासिनी कोयटे,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य,पालक वर्ग आदींसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्याध्यापिका आशा मोकळ यांनी केले तर शिक्षिका तृप्ती कासार यांनी वार्षिक अहवाल सादर केला आहे.कार्यक्रम यशस्वीतेसाठी समता इंटरनॅशनल स्कूलचे शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,वाहतूक विभाग यांनी विशेष परिश्रम घेतले आहे.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व विभावरी नगरकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार समता इंटरनॅशनल स्कूलच्या मराठी विभाग प्रमुख सीमा सोमासे यांनी मानले आहे.