शैक्षणिक
विद्यार्थ्यांनी कौशल्य विकास साध्य करावा-जिल्हाधिकारी

न्यूजसेवा
संवत्सर-(वार्ताहर)
वर्तमान विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकापुरते मर्यादीत न राहता आपले कौशल्य केंद्रित करून विकास साध्य करावा व त्यासाठी स्नेहसंमेलनासारखे कार्यक्रम उपयुक्त असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांनी संवत्सर येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
“संवत्सर परिसरात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राजेश परजणे यांनी राबविलेले समाजोपयोगी प्रकल्प पाहून समाधान व्यक्त केले.माणसाजवळ ईच्छाशक्ती आणि प्रयत्न करण्याची जिद्द असेल तर काहीही शक्य करता येते हे संवत्सर येथे आल्यावर दृष्टीस पडते.या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून झालेला ग्रामविकास आदर्शवत आहे”-राकेश ओला,पोलीस अधीक्षक,अ.नगर जिल्हा.
संवत्सर जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम नुकताच पार पडला आहे.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी सालीमठ बोलत होते.
सदर प्रसंगी जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला,कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी हेही प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”संवत्सरची शाळा इतर शाळांपेक्षा क्रियाशील व समृध्द शाळा आहे.राज्यातील इतर शाळांनी या शाळेचा आदर्श घेतला तर शैक्षणिक स्तर उंचावण्यास निश्चितच हातभार लागेल असे सांगून जिल्हाधिकारी सालीमठ यांनी शाळेत मुलींच्या सोईसाठी सायकल बँक हा उपक्रम सुरु केला तर त्यातून मुलींना शिक्षण घेण्यासाठी अधिक चालना मिळू शकते. आठवी वर्गातील मुलीने शाळेच्या बँकेतून सायकल घेतल्यावर ती दहावीपर्यंत म्हणजे तीन वर्षे वापरायची आणि त्यानंतर ती पुन्हा बँकेत (शाळेत) जमा करायची.जमा केलेल्या सायकली पुन्हा दुसऱ्या मुलींना वापरण्यासाठी द्यायच्या.असा हा उपक्रम असून शाळेने सायकल बँक सुरु केली तर,सर्वप्रथम आपण आपल्या तर्फे सायकल भेट देईल असे जाहीर करुन या शाळेतून मलाही चांगली प्रेरणा घेता आली असल्याचे शेवटी सांगितले आहे.
शाळेसाठी नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत खा.सदाशिव लोखंडे यांनी दिलेल्या ७२ इंची इंटर अॅक्टीव्ह बोर्डचे उद्घाटन जिल्हाधिकारी सालीमठ यांच्या हस्ते करण्यात आले.तर शाळेच्या आवारात तसेच महंत राजधरबाबा प्राणवायू स्मृतीवनात पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याहस्ते वृक्षरोपण करण्यात आले.शाळेत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची पाहणी करून उपस्थितांनी समाधान व्यक्त केले आहे.
सदर प्रसंगी प्रारंभी महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी स्वागत तर गट शिक्षणाधिकारी श्रीमती शबाना शेख यांनी प्रास्ताविक केले आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक संदीप वाघमारे यांनी केले तर मुख्याध्यापक फय्याजखान पठाण यांनी आभार व्यक्त केले.