शैक्षणिक
कोपरगाव तालुक्यात श्रमसंस्कार शिबिर उत्साहात संपन्न
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठ व कोपरगाव येथील के.जे.सोमय्या महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कोपरगाव तालुक्यातील डाऊच बु.येथे नुकतेच राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे.
राष्ट्रीय सेवा योजना उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम,राष्ट्रीय एकात्मता,सर्वधर्मसमभाव,सहिष्णुता,सामाजिक बांधिलकी यासाठी स्वयंसेवक तत्पर व सक्षम व्हावा,यासाठी राष्ट्रीय सेवा योजना नियमित कार्यक्रम व विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर या दोन उपक्रमांद्वारे समाजप्रबोधन करण्याचे कार्य करीत आहे.कोपरगाव तालुक्यातील डाऊच खु.येथे ते के.जे.सोमैय्या महाविद्यालयाच्या वतीने नुकतेच मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे.
या शिबिराची थीम युवकांचा ध्यास ग्राम-शहर विकास अशी होती.शिबिराचा समारोप नूकताच संपन्न झाला आहे. सदर प्रसंगी के.जे.सोमय्या महाविद्यालयाच्या महाविद्यालय विकास समितीचे सदस्य कांतीलाल वक्ते हे उपस्थित होते.तसेच गोदामाई प्रतिष्ठानचे संस्थापकीय अध्यक्ष आदिनाथ ढाकणे आणि डाऊच बुद्रुक गावचे सरपंच दिनेश गायकवाड,उपसरपंच भीवराव दहे तसेच ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते तसेच गावचे ग्रामस्थ व निवृत्त सैनिक बी.एम.गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर प्रसंगी बोलताना कांतीलाल वक्ते म्हणाले की,”स्वयंसेवकांनी स्वतःच्या व्यक्तीमत्वाचा विकास करायचा असेल तर एन.एस.एस.शिबिरासारखे दुसरे प्रभावी साधन नाही.एन.एस.एस.शिबिराच्या माध्यमातून स्वयंसेवकांनी स्वतःचा विकास करून पर्यावरणाचे संरक्षण करावे जागतिक तापमानवाढ,तापमान बदल त्याचबरोबर नदीचे प्रदूषण यासारख्या अनेक समस्या आपल्याला भेडसावत असून त्या भविष्यातही भेडसावणार आहेत.यावर उत्तम उपाय म्हणून प्रत्येकाने वृक्षारोपणाचा ध्यास घेतला पाहिजे आणि त्यासाठी सदैव वृक्षारोपण हे केले पाहिजे. कोपरगाव मध्ये कोपरगाव,’ग्रीन फोरम’ या नावाने एक एन.जी.ओ.स्थापन करून आम्ही हे वृक्षारोपणाचे काम हाती घेतल्याचे त्यांनी सांगितले आहे.
सदर प्रसंगी गोदामाई प्रतिष्ठानचे संस्थापकीय अध्यक्ष आदिनाथ ढाकणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आहे.
सदर कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.बी.एस.गायकवाड प्रा.डॉ.एस.एस.नागरे,प्रा.येवले मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले.या शिबिरामध्ये स्मशानभूमी स्वच्छता,ग्राम स्वच्छता,ग्राम सर्वेक्षण,सामाजिक प्रश्नावर पथनाट्य,राजमाता जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर व्याख्यान,दुपारची व्याख्यानसत्र,गांडूळ खत प्रकल्प त्याचबरोबर शोष खड्डे,वृक्षारोपण इत्यादी विषयावरती भर देण्यात आला.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार एन.एस.एस.स्वयंसेविका कु. प्रेरणा उगले हिनी केले तर उपस्थितांचे बाहेर प्रा.पगारे यांनी मानले आहे.