शैक्षणिक
प्राथमिक शिक्षकांच्या वेतनास पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा-मागणी
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या सातत्याने गेली चार महिन्या पासून होणारे वेतन विलंबाबाबत आज तहसिलदार विजय बोरुडे यांचे मार्फत राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना शिक्षक परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन देऊन वेतन विलंबाच्या प्रश्नाबाबत लक्ष वेधले आहे.
राज्यातील राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन आधीच प्रलंबित असताना आता शिक्षकांचे वेतनही प्रलंबित असल्याचे निष्पन्न झाले आहे.त्यामुळे राज्य सरकार आता याबाबत काय भूमिका घेणार याकडे विविध संघटनांचे लक्ष लागून आहे.
कोपरगाव तहसिलदार बोरुडे यांनी शिक्षक परिषदेच्या निवेदनाची दखल घेऊन तत्काळ मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री कार्यालय यांचेकडे निवेदन पाठविण्याचे आश्वासन दिले आहे.
सदर प्रसंगी शिक्षक परिषदेचे जिल्हासह कार्यध्यक्ष सुभाष गरुड,तालूका अध्यक्ष दिपक झावरे,मच्छिंद्र सोनवणे,शिवाजी पंडीत,आदिनाथ जपे,सुदाम साळुंके,हनुमंत पदमेरे हे पदाधिकारी उपस्थित होते.याचेबरोबरच निवेदनावर रावसाहेब रोहकले प्रणित गुरुमाऊली मंडळाचे अध्यक्ष शिवाजी आभाळे,जेष्ठ शिक्षक अशोक थोरात,सिताकांत खांडगौरे,मुकुंद सोनवणे,हेमराज जावळे,नामदेव सोनवणे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत .