जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

आनंद मेळाव्यामुळे विदयार्थ्यांचे व्यवहारज्ञान वाढीस लागते-माहिती

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
शाळेत आयोजित केलेल्या आनंद मेळाव्यामुळे विद्यार्थ्यांचे व्यावहारिक ज्ञान वाढीला लाग असल्याचे प्रतिपादन जनार्दन स्वामी आश्रमाचे विश्वस्त रमेशगीरी महाराज यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“पालकांनी आपल्या पाल्यासाठी वेळ दिला पाहिजे,वेळोवेळी आपल्या पाल्याची शालेय प्रगती,विविध कार्यक्रमा बद्दल माहिती घेतली पाहिजे.आनंद मेळावा हा कमवा व शिका या योजनेचाच एक भाग असून त्यातून विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक शिस्त निर्माण होते”-दत्तात्रय होळकर,अध्यक्ष,श्री काशीविश्वनाथ महादेव ट्रस्ट,कोपरगाव बेट.

संत जनार्दन स्वामी महाराज महर्षी स्कूलमध्ये रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त खास अशा पंचवीसव्या आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय होळकर,उपाध्यक्ष विलास कोते,सचिव अंबादास अंत्रे,विश्वस्त रामकृष्ण कोकाटे,ऍड.अनिल जाधव,बाळासाहेब चव्हाण,शिवनाथ शिंदे,जनार्दन स्वामी ट्रस्टचे व्यवस्थापक विजय जाधव व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की,”सन-१९९८ साली स्व.मोहनराव चव्हाण यांनी दोन खोल्यांमध्ये ही शाळा सुरू केली आज २४ वर्षे पूर्ण होऊन शाळेचे रौप्य महोत्सवी वर्षे सुरू झाले आहे.पालकांची शाळेशी असलेली बांधिलकी अशीच टिकुन रहावी असे आवाहन पालकांना केले आहे.

सदर प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय होळकर म्हणाले की,”पालकांनी आपल्या पाल्यासाठी वेळ दिला पाहिजे,वेळोवेळी आपल्या पाल्याची शालेय प्रगती,विविध कार्यक्रमा बद्दल माहिती घेतली पाहिजे.आनंद मेळावा हा कमवा व शिका या योजनेचाच एक भाग असून त्यातून विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक शिस्त निर्माण होते.

सदर २५ व्या आनंद मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी जयप्रकाश पांडेय,अनिल भागवत,विनायक सांगळे,महेश शिंदे,इम्रान शेख,किशोर भोसले,सारिका पाटील,शादमीन सय्यद,वनिता औताडे,सुरज तुवर,कल्पेश येवला,अमोल देशमुख,माधवी शिंदे,ज्ञानेश्वर कडलग यांसह सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले आहे.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य पानसरे यांनी केले तर सूत्र संचालन समृद्धी कोहोकडे व श्रद्धा तिडके यांनी केले तर आभार स्नेहल खंडिझोड हिने मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close