शैक्षणिक
कोपरगांव शहरात,’रेझिंग डे’ उत्साहात संपन्न
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
माजी पंतप्रधान स्व.पंडित जवाहरलाल नेहरू यांनी २ जानेवारी १९६१ रोजी महाराष्ट्र पोलिस विभागास ध्वज सुपूर्त केला होता.त्या दिनानिमित्त महाराष्ट्र पोलिस विभागाचा २ जानेवारी हा दिवस,’रेझिंग डे’ म्हणून साजरा केला जात असून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात तो उत्साहात संपन्न झाला आहे.
दिवंगत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दोन जानेवारी १९६१ रोजी महाराष्ट्र पोलिस विभागास ध्वज सुपूर्त केला होता.त्या दिनानिमित्त महाराष्ट्र पोलिस विभागाच्या वतीने नुकताच कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात,’रेझिंग डे’ साजरा केला आहे.त्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली २ ते ८ जानेवारी हा ‘रेझिंग डे’ सप्ताह म्हणून साजरा केला जात असून या निमित्ताने पोलीस ठाण्यात शाळेतील विद्यार्थ्यांना २४ तास कर्तव्यावर असलेल्या पोलिसांचे कामकाजा विषयी माहिती व्हावी,यासाठी ‘भेट पोलिस ठाण्यास’ हा उपक्रम राबविण्यात आला आहे.शहर पोलिस ठाणे अंतर्गत असलेल्या श्रीमान गोकुळचंद विदयालयातील विदयार्थींनी नुकतीच या निमित्तानं पोलिस ठाण्यास नुकतीच भेट दिली आहे.
कोपरगांव शहर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले,पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोबरे,पोलीस उपनिरीक्षक संजय पवार, पोलीस कॉन्स्टेबल राम खारतोडे,श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयाचे शिक्षिका श्वेता मालपुरे मॅडम,अनिल काले,संजीवनी सैनिकी स्कुलचे शिक्षक व विदयार्थी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात श्रीमान गोकुळचंद विद्यालयांतील विद्यार्थी,शिक्षक यांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले,पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोबरे,पोलीस उपनिरीक्षक संजय पवार यांनी विद्यार्थ्यांना पोलिसाच्या दैनंदिन कार्य,पोलीस ठाण्यातील विविध विभाग,पोलिसांची शस्त्र,सायबर क्राईम याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.