शैक्षणिक
कोपरगावातील…या दोन महाविद्यालयात जात पडताळणी सहाय्यता केंद्र
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील ११ वी व १२ वी विज्ञान विभागात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जात पडताळणीसाठी येणाऱ्या अडचणींची दखल घेऊन जात पडताळणी कार्यालय अ.नगर यांच्या माध्यमातून व आ.आशुतोष काळे यांच्या सहकार्याने एस. एस.जी.एम.व के.जे.सोमैया महाविद्यालयात सोमवार दि.२८ नोव्हेंबर पासून जात पडताळणी सहाय्यता केंद्र सुरु करणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
कोपरगाव शहरातील प्रत्येक प्रभागात मतदार नोंदणी अभियान राबविण्यात आले आहे.त्या अभियानाला मोठा प्रतिसाद मिळाला असून त्याच धर्तीवर ज्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे १ जानेवारी २०२३ रोजी वय वर्ष १८ पूर्ण होणार आहे.अशा सर्व विद्यार्थ्यांची मतदार नोंदणी देखील एस.एस.जी.एम. व के.जे.सोमैया महाविद्यालयात सोमवार दि.२८ पासून गुरुवार दि.०१ डिसेंबर या चार दिवस केली जाणार आहे.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांना विविध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा मिळविण्यासाठी जात पडताळणी अत्यंत आवश्यक आहे. मात्र या जात पडताळणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होत आहे.याची दखल घेऊन या सर्व विद्यार्थ्याना जात पडताळणी प्रमाणपत्र महाविद्यालयातच उपलब्ध व्हावे यासाठी महसूल विभागाने पुढाकार घेत एस.एस.जी.एम. व के.जे.सोमैया महाविद्यालयात सोमवार दि.२८ पासून गुरुवार दि.०१ डिसेंबर या चार दिवस हे जात पडताळणी सहाय्यता केंद्र सुरु राहणार आहे.
तसेच ज्याप्रमाणे कोपरगाव शहरातील प्रत्येक प्रभागात मतदार नोंदणी अभियान राबविण्यात आले आहे.त्या अभियानाला मोठा प्रतिसाद मिळाला असून त्याच धर्तीवर ज्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे १ जानेवारी २०२३ रोजी वय वर्ष १८ पूर्ण होणार आहे.अशा सर्व विद्यार्थ्यांची मतदार नोंदणी देखील एस.एस.जी.एम. व के.जे.सोमैया महाविद्यालयात सोमवार दि.२८ पासून गुरुवार दि.०१ डिसेंबर या चार दिवस केली जाणार आहे. या जात पडताळणी सहाय्यता केंद्राचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा व जे विद्यार्थी मतदान करण्यासाठी १ जानेवारी २०२३ रोजी १८ वर्ष पूर्ण करणार आहे.त्यासर्व विद्यार्थ्यांनी आपली मतदार नोंदणी करावी व कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क करावा असे आवाहन आ.काळे यांनी केले आहे.