शैक्षणिक
कोपरगाव येथील व्हॉलीबॉल स्पर्धेचा निकाल जाहीर

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
माजी आ.के.बी.रोहमारे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग,अ.नगर आंतरविभागीय क्रीडा समिती व महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या आंतरविभागीय व्हॉलीबॉल स्पर्धात प्रथम क्रमांक पुणे शहर संघाने,द्वितीय क्रमांक नाशिक संघाने तर तृतीय व चतुर्थ क्रमांक अनुक्रमे पुणे ग्रामीण व नगर संघाने प्राप्त केला आहे या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
दिवस-रात्र स्वरूपात खेळण्यात आलेल्या या स्पर्धेत पुणे शहर,पुणे ग्रामीण,नाशिक व अ.नगर या चार विभागांच्या संघाने सहभाग नोंदविला होता.या स्पर्धेचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ.दत्ता महादम,कोपरगाव तालुका एज्युकेशन.सोसायटीचे विश्वस्त संदिप रोहमारे,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव यांच्या हस्ते संपन्न झाले होते.
कोपरगांव येथील के.जे.सोमैया वरिष्ठ महाविद्यालयात कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष,माजी आ.कै.के.बी.रोहमारे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग,अ.नगर आंतरविभागीय क्रीडा समिती व महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आंतरविभागीय व्हॉलीबॉल स्पर्धाचे (मुले) आयोजन दि.८ नोव्हेंबर ते ९ नोव्हेंबर या दरम्यान करण्यात आले होते त्यात त्यांनी हे यश प्राप्त केले आहे.
या प्रसंगी महाविद्यालयाचे रजिस्ट्रार डॉ.अभिजित नाईकवाडे,लायन्स मूकबधिर शाळेचे मुख्याध्यापक भास्कर गुरसळ तसेच विभागीय स्पर्धेचे निवड समितीचे सर्व सदस्य,संघांचे संघव्यवस्थापक व क्रीडा मार्गदर्शक उपस्थित होते.
सदर स्पर्धा यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे शारिरीक शिक्षण संचालक डॉ.सुनिल कुटे व कनिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक मिलिदं कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले होते.