शैक्षणिक
उर्दू हायस्कुल फेडरेशनच्या अध्यक्षपदी मुल्ला
जनशक्ती न्यूजसेवा
श्रीरामपूर-(प्रतिनिधी)
अहमदनगर जिल्हा उर्दू हायस्कूल मुख्याध्यापक फेडरेशनच्या अध्यक्षपदी शेवगाव उर्दू हायस्कूल चे मुख्तार मुल्ला व सचिवपदी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर उर्दू हायस्कूल बेलापूर ता.श्रीरामपूर चे जाकिर सय्यद यांची निवड झाली आहे.त्यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
शनिवारी अहमदनगर जिल्हा उर्दू हायस्कूल मुख्याध्यापक फेडरेशनची चाँद सुल्ताना उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज अहमदनगर येथे सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली त्यात नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे.
यावेळी अध्यक्ष पदी मुख्तार मुल्ला,सचिव पदी जाकिर सय्यद,उपाध्यक्ष पदी खलील,शहेनाज सय्यद बाजी,सहसचिव-फजल सांगलीकर,खजिनदार- रज्जाक पटेल तर कार्यकारिणी सदस्य म्हणून जमीर शेख,रफीक शेख,आतिक शेख,युनूस शेख,जैद मिर्झा,फरहाना मिर्झा बाजी,नजमुस्सहेर बाजी,महेजबीन खान बाजी,आरेफा सय्यद बाजी,अफजल,इकबाल गफूर,रामकृष्ण धुमाळ यांची व सल्लागार म्हणून महमूद शेख,हारुण खान,डॉ.हाजी अब्दुस सलाम,सिराज,जहांगीर खान,रिजवाना बाजी,रियाज शेख यांची निवड करण्यात आली आहे.