शैक्षणिक
अविष्कार स्पर्धेत…या महाविद्यालयाचे लक्षवेधी यश !

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
लोणेरे येथे संपन्न झालेल्या विविध स्पर्धेत राष्ट्रसंत जनार्दन स्वामी कॉलेज ऑफ फार्मसी,कोकमठाणच्या विद्यार्थ्यांनी सर्वाधिक ६ सुवर्ण व ३ रौप्य अशी एकूण ९ पदके मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

दरम्यान यशस्वी विद्यार्थ्यांना प्रा.दादासाहेब कावडे यांचे संशोधन मार्गदर्शन आणि प्रा.प्रसन्न दळवी प्रा.रुद्रेश रत्नपारखे आदींचे मार्गदर्शन लाभले होते.विजेत्यांचा पदके,भेटवस्तू व प्रमाणपत्रे देऊन गौरव करण्यात आला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
लोणेरे येथे नुकत्याच डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठामार्फत विभागीय आविष्कार मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या आहेत.त्यात आर.जे.एस.च्या विद्यार्थ्यांनी ही लक्षवेधी यश संपादन केले आहे.या स्पर्धेत महाविद्यालयातील औषध व फार्मसी गटात गायत्री शांताराम उपाध्ये (पदवी) आणि धनश्री संजय बढे (पदव्युत्तर) यांनी सुवर्णपदके मिळवली.कृषी व पशुसंवर्धन गटात शुभम सुनील घनवट (पदव्युत्तर) यांनी सुवर्ण,तर दीक्षा राजेंद्र शेलार (पदवी) यांनी रौप्यपदक पटकावले आहे.शुद्ध विज्ञान गटात श्रुतिका रमेश वक्ते (पदव्युत्तर) यांनी सुवर्ण,तर चैताली भारत साळुंके (पदव्युत्तर) यांनी रौप्यपदक मिळवले.मानवविद्या,भाषा व ललित कला गटात रुद्र विकास गाडे (पदवी) यांनी सुवर्ण,तर पूजा हिम्मत शिंदे (पदव्युत्तर) यांनी रौप्यपदक मिळवले.तसेच वाणिज्य,व्यवस्थापन व विधी गटात क्षितिजा नितीन जामधडे (पदवी) यांनी सुवर्णपदक पटकावून महाविद्यालयाच्या यशात भर घातली असल्याचे मानले जात आहे.त्यांना प्रा.दादासाहेब कावडे यांचे संशोधन मार्गदर्शन आणि प्रा.प्रसन्न दळवी प्रा.रुद्रेश रत्नपारखे आदींचे मार्गदर्शन लाभले होते.विजेत्यांचा पदके,भेटवस्तू व प्रमाणपत्रे देऊन गौरव करण्यात आला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
या यशाबद्दल आर.जे.एस.फाउंडेशनचे अध्यक्ष चांगदेव कातकडे,प्रसाद कातकडे,विजय कडू,दिपक कोटमे,प्रणित कातकडे,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नितीन जैन,उपप्राचार्या डॉ.उषा जैन, प्राध्यापकवर्ग शिक्षकेतर कर्मचारी आदींनी अभिनंदन केले आहे.



