शैक्षणिक
डॉ.स्वाती रहाणे सारथीच्या वतीने सन्मानित !

न्यूजसेवा
कोपरगांव -(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील के.जे.सोमैया महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागाची माजी विद्यार्थिनी डॉ.स्वाती नामदेव रहाणे यांना महाराष्ट्र शासनाच्या ‘सारथी’ या संशोधन संस्थेच्या वतीने ‘सारथी सन्मान’ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुभहस्ते व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे येथे एका शासकीय समारंभात प्रदान करण्यात आला असल्याची माहिती प्राचार्य डॉ.विजय ठाणगे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

मराठा व कुणबी समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल परंतु गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी ‘सारथी’ शिष्यवृत्ती प्रदान करते.संशोधनासाठी विद्यार्थ्यांना आर्थिक मदत (फेलोशिप) दिली जाते.समाजाच्या विविध समस्या,शेतीचे प्रश्न आणि आर्थिक परिस्थिती यावर अभ्यासपूर्ण संशोधन करून शासनाला धोरणात्मक अहवाल सादर करणे हे या संस्थेचे मुख्य कार्य मानले जाते.या संस्थेमार्फत के.जे.सोमैया महाविद्यालयातील विद्यार्थिनीची निवड होणे ही मोठी उपलब्धि असल्याचे मानले जात आहे.
सारथी (छत्रपती शाहू महाराज संशोधन,प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था, पुणे) ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था आहे.मराठा,कुणबी आणि कृषी-आधारित समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी ही संस्था कार्यरत असून,विविध स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण,कौशल्य विकास आणि संशोधन आधारित उपक्रम राबवते.यु.पी.एस.सी,एम.पी.एस.सी. आणि बँकिंग परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मोफत किंवा सवलतीच्या दरात प्रशिक्षण दिले जाते.युवकांना रोजगाराभिमुख बनवण्यासाठी विविध तांत्रिक व व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जातात.मराठा व कुणबी समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल परंतु गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी ‘सारथी’ शिष्यवृत्ती प्रदान करते.संशोधनासाठी विद्यार्थ्यांना आर्थिक मदत (फेलोशिप) दिली जाते.समाजाच्या विविध समस्या,शेतीचे प्रश्न आणि आर्थिक परिस्थिती यावर अभ्यासपूर्ण संशोधन करून शासनाला धोरणात्मक अहवाल सादर करणे हे या संस्थेचे मुख्य कार्य मानले जाते.त्या संस्थेमार्फत के.जे.सोमैया महाविद्यालयातील विद्यार्थिनीची निवड होणे ही मोठी उपलब्धि असल्याचे मानले जात आहे.त्याबाबत तिचा महाविद्यालयाच्या वतीने सत्कार आयोजित केला होता त्यावेळी प्राचार्य डॉ.ठाणगे यांनी ही माहिती दिली आहे.

त्यावेळी अधिक माहिती देताना डॉ.ठाणगे म्हणाले की “डॉ.स्वाती रहाणे यांनी अकरावी पासून बी.एस्सी.पदवी पर्यंत सोमैया महाविद्यालयात उच्च शिक्षण घेतले.त्यांचे लक्षवेधी यश आणि प्रज्ञा हेरून महाविद्यालयाने त्यांना पदव्युत्तर पदवी व पुढील संशोधनासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पाठविण्याचा निर्णय घेतला होता.त्यानुसार डॉ.रहाणे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागातून एम.एस्सी.व डॉ.संदेश जाडकर यांच्या मार्गदर्शनात पी.एच.डी.ही उच्च पदवी प्राप्त केली आहे.वर्तमानात स्वाती रहाणे ही ‘आय.आय.एस.सी. बेंगलुरु’ येथे ‘पोस्ट डॉक्टरल रिसर्च’ करीत असून त्यांना ‘महिला वैज्ञानिक फेलोशिप’, ‘छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन फेलोशिप’ व ‘यंग वुमन रिसर्च ऑफ इयर 2024’ असे अनेक नामांकित पुरस्कार देखील मिळाले आहेत.डॉ.स्वाती रहाणे यांच्या या कर्तृत्वाने संस्था व महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.त्यांच्या कर्तृत्वाचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचे शेवटी सांगितले आहे.
दरम्यान डॉ.रहाणे यांना भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ.बापूसाहेब भोसले व डॉ.निलेश पोटे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले होते.डॉ.रहाणे यांच्या या यशाबद्दल संस्थाध्यक्ष अशोक रोहमारे,सचिव ॲड.संजीव कुलकर्णी,कार्यकारी विश्वस्त संदीप रोहमारे आदींसह कोपरगाव तालुक्यातून अभिनंदन होत आहे.



