जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

…या विद्यार्थ्याने मिळवले लक्षवेधी यश!

न्यूजसेवा.

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   कोपरगांव येथील संजीवनी विद्यापीठाचा विद्यार्थी श्रीराज वैभव गिरमे याची आय.आय. टी.कानपुर येथे सायबर सुरक्षा अभ्यासक्रमाच्या अडीच महिने प्रशिक्षणासाठी निवड झाली त्याबददल त्याचा संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी सत्कार केला आहे.विद्यार्थ्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

  संजीवनी युनिव्हरसिटीचा विद्यार्थी श्रीराज वैभव गिरमे याची आय आय टी कानपुर येथे सायबर सुरक्षा अभ्यासक्रमाच्या अडीच महिने प्रशिक्षणासाठी निवड झाली त्याबददल त्याचा संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी सत्कार केला.

  भारतीय तंत्रज्ञान संस्था कानपूर ही १९५९ मध्ये स्थापन झालेली भारतातील एक प्रमुख सार्वजनिक अभियांत्रिकी संस्था आहे.उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये स्थित ही संस्था,उच्च दर्जाचे तांत्रिक शिक्षण,संशोधन आणि नावीन्यपूर्ण स्टार्टअप्ससाठी ओळखली जाते.ही संस्था ५०० हून अधिक स्टार्टअप्ससह देशातील अग्रगण्य शैक्षणिक संस्थांपैकी एक आहे.ही संस्था तंत्रज्ञान आणि संशोधनाच्या क्षेत्रात देशाच्या विकासात मोलाची भर घालत आहे.या संस्थेत उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळणे हे विद्यार्थी विश्वात गौरवाचे मानले जाते.त्या यशात आता कोपरगाव येथील संजीवनी विद्यापीठाचा विद्यार्थी श्रीराज गिरमे याचा २८३ विद्यार्थ्यांत समावेश झाला आहे.त्याबद्दल त्याचा सत्कार आयोजित केला होता त्यावेळी त्याचा गौरव केला आहे.

सदर प्रसंगी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक विश्वास महाले,विलास माळी,बाळासाहेब वक्ते,निवृत्ती बनकर आदि विविध क्षेत्रातील मान्यवर संजीवनी उद्योग समुहातील सर्व संस्थांचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

त्याबद्दल बिपीन कोल्हे यांनी त्याचे कौतुक करताना पुढे म्हटले आहे की,”ग्रामिण भागात राहुन श्रीराज गिरमे याने आय.आय.टी.कानपुर येथे सायबर सिक्युरिटी अभ्यासाच्या प्रशिक्षणाची खडतर परिक्षा उत्तीर्ण केली त्याबददल त्याचे व आई वडीलांचे तसेच गुरूजनांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे.आज जगात सायबर सुरक्षेला विशेष महत्व आले आहे.चि.श्रीराज याचे के.जी पासुन ते बी.टेक.आय.टी.सायबर सिक्युरिटीपर्यंतचे शिक्षण संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टीटयुट मध्येच झाले आहे.माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी ४४ वर्षापुर्वी जे स्वप्न पाहिले त्यासाठीच्या सर्व पायाभुत सुविधा संजीवनीत उपलब्ध करून दिल्या त्याचे श्रीराजने चीज केले असल्याचे गौरवोद्गार काढले आहे.

  यावेळी प्रारंभी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परजणे यांनी उपस्थितांचे स्वागत केले आहे.शेवटी संचालक निवृत्ती बनकर यांनी आभार मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close