जाहिरात-9423439946
शैक्षणिक

…या महाविद्यालयात विद्यापीठस्तरीय संशोधन कार्यशाळा संपन्न

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

    कोपरगाव येथील स्थानिक के.जे.सोमैया महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने तीन दिवसीय विद्यापीठस्तरीय संशोधन पद्धती मार्गदर्शन कार्यशाळा नुकतीच मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.या कार्यशाळेचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ.धोंडीराम पवार यांच्या हस्ते संपन्न झाली आहे.

“संशोधन म्हणजे माहितीच्या आधारे सत्याचा शोध घेणे व ज्ञानाच्या कक्षा रुंदावणे होय.संशोधन हे ज्ञानाचा साठा वाढविण्यासाठी हाती घेतलेले सर्जनशील आणि पद्धतशीर कार्य आहे”- डॉ. धोंडीराम पवार,सदस्य,पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद.

   विद्यापीठस्तरीय संशोधन पद्धती मार्गदर्शन कार्यशाळा ही प्रामुख्याने पदव्युत्तर विद्यार्थी आणि शोधनिबंध लिहिणाऱ्या संशोधकांसाठी आयोजित केली जाते.या कार्यशाळेचा मुख्य उद्देश संशोधनाचा दर्जा उंचावणे आणि संशोधकांना तांत्रिक कौशल्ये शिकवणे हा असतो.संशोधन आराखडा संशोधनाचा विषय निवडणे,उद्दिष्टे ठरवणे आणि कामाचा आराखडा तयार करणे आदी कामे यातून तयार करून विद्यार्थ्यांना संशोधन प्रवृत्त केले जात असते.कोपरगाव येथील के.जे.सोमैया महाविद्यालयात हा उपक्रम नुकताच संपन्न झाला आहे.

   सदर प्रसंगी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे,विश्वस्त संदिप रोहमारे,प्रसिद्ध कवि,गीतकार व पटकथा लेखक रविन्द्र कांगणे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रशांत घुले,प्राचार्य विजय ठाणगे आदी मान्यवर उपस्थित होते.

   यावेळी डॉ.धोंडीराम पवार यांनी या कार्यशाळेच्या उद्घाटनाची उद्घोषणा करतानांच संशोधन म्हणजे माहितीच्या आधारे सत्याचा शोध घेणे व ज्ञानाच्या कक्षा रुंदावणे होय.संशोधन हे ज्ञानाचा साठा वाढविण्यासाठी हाती घेतलेले सर्जनशील आणि पद्धतशीर कार्य असल्याचे म्हटले.रविन्द्र कांगणे यांनी अनेक कवितेच्या सादरीकरणातुन साहित्य निर्मितीची प्रक्रिया व जीवनाचे वास्तव मांडले आहे.

    अध्यक्षीय मनोगतात कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त संदीप रोहमारे यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत महाविद्यालय स्तरावर राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक करतांनाच संशोधन पद्धती या विषयावर आधारित या कार्यशाळेच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीतुन नवनिर्माण साकार होण्यास मदत होईल.विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी व संशोधनपरक दृष्टिकोण वाढीसाठी महाविद्यालय सदैव कटिबध्द असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.

   महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजय ठाणगे यांनी स्वागत मनोगतात उपस्थितांचे स्वागत करतांनाच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभागाने ही नाविन्यपूर्ण कार्यशाळा महाविद्यालयात आयोजित करण्याची संधि उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमात संशोधन प्रकल्प यासारखे विषय समाविष्ट असल्याने संशोधन पद्धती या अत्यंत महत्त्वाच्या विषयाच्या ह्या कार्यशाळेचा फायदा महाविद्यालयातील सर्वच विद्यार्थ्यांना होईल असा आशावाद व्यक्त केला आहे.
  
    या तीन दिवसीय कार्यशाळेत डॉ.दिगंबर घोडके,डॉ.अशोक गायकवाड,प्रा.अमोल चिने,प्रा.श्रीकांत जोशी,सुहास नाईक-साटम,राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे जिल्हा समन्वयक डॉ.गणेश निमसे,डॉ.सुनील मोहटे यांचे मार्गदर्शन सत्रे संपन्न झाली आहे.विविध विषयावर आधारित या मार्गदर्शन सत्रात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांबरोबरच महाविद्यालयातील संशोधन केंद्राचे संशोधक विद्यार्थी यांची उपस्थिति लक्षवेधी होती.

सदर कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी जिल्हा समन्वयक डॉ.सुनील मोहटे,कार्यक्रम अधिकारी डॉ.बी.एस.गायकवाड़,डॉ.संजय दवंगे,प्रा.रोहिणी घुगे व महाविद्यालयाचे रजिस्ट्रार डॉ.अभिजीत नाईकवाडे आदीनी प्रयत्न केले आहे.

   सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.संजय दवंगे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अमोल चिने यांनी तर उपस्थितांचे आभार मुख्यकार्यक्रम अधिकारी डॉ.बी.एस.गायकवाड यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close