जाहिरात-9423439946
शैक्षणिक

विद्वानांनी प्रसारासाठी खेड्यापाड्यात जाण्याची गरज-…यांचे प्रतिपादन

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   “विद्यापीठ आणि परिसरातील नामवंत विद्वानांनी केवळ चार भिंतीच्या आतच मार्गदर्शन करून भागणार नाही,तर त्यांनी ग्रामीण भागातील खेड्यापाड्यात जाऊन जीवनोपयोगी विषयावर व्याख्याने द्यावीत आणि विद्यार्थी तसेच लोकांचाही ज्ञानविस्तार करावा असे आवाहन कोपरगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना ज्येष्ठ प्राध्यापक डॉ.मोहनराव देशमुख यांनी केले आहे.

डॉ.बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेत बोलताना प्रमुख वक्ते म्हणून डॉ.मोहनराव देशमुख.

   

“ज्या देशातील जनतेचे आरोग्य उत्तम तो जगातील सर्वात सुखी देश होय.आज अन्नभेसळ ही एक मोठी समस्या असून खेदाची गोष्ट म्हणजे ती आजही दुर्लक्षित आहे.आपल्या देशात अन्न भेसळी संदर्भात कायदा झाला परंतु त्याचे व्यवस्थित पालन होत नाही ही बाब अत्यंत खेदजनक आहे”-के.के.देशमुख,माजी प्राचार्य.

    कोपरगाव येथील तालुका एज्युकेशन सोसायटीच्या के.जे.सोमैया महाविद्यालयाच्या बहि:शाल शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित डॉ.बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या ‘संतांचे तत्त्वज्ञान आणि आपले जीवन’ या विषयावर आयोजित व्याख्यान सत्रात प्रमुख वक्ते म्हणून डॉ.देशमुख बोलत होते.सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजय ठाणगे होते.त्यावेळी प्राध्यापक,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”शिक्षण प्रसाराच्या हेतूने स्थापन झालेल्या ब:हिशाला शिक्षण मंडळ आणि बॅ.जयकर व्याख्यानमालेच्या माध्यमातून आज संतांचे तत्त्वज्ञान समजावून घेताना संत ज्ञानेश्वर,नामदेव,तुकाराम ते थेट राष्ट्रसंत गाडगेबाबा यांचे जीवन आणि कार्य आजच्या धकाधकीच्या जीवनात अत्यंत मार्गदर्शक आहे” असे प्रतिपादन शेवटी डॉ.देशमुख यांनी केले आहे.

   त्यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजय ठाणगे म्हणाले की,”बहि:शाल शिक्षण मंडळाच्या माध्यमातून होणाऱ्या बॅरिस्टर डॉ.जयकर व्याख्यानमाला म्हणजे पाठ्यपुस्तकेतर विषय समजावून घेण्याचे एक चांगले व्यासपीठ आहे.विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेऊन आपले व्यक्तिमत्व बहुआयामी बनवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

   दरम्यान यावेळी ” व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प ‘अन्न भेसळ : एक सामाजिक कीड’ या विषयावर संगमनेर येथील माजी प्राचार्य डॉ.के.के.देशमुख यांनी गुंफले.याप्रसंगी ते म्हणाले की, “ज्या देशातील जनतेचे आरोग्य उत्तम तो जगातील सर्वात सुखी देश होय.आज अन्नभेसळ ही एक मोठी समस्या असून खेदाची गोष्ट म्हणजे ती आजही दुर्लक्षित आहे.आपल्या देशात अन्न भेसळी संदर्भात कायदा झाला परंतु त्याचे व्यवस्थित पालन होत नाही.आपल्या रोजच्या आहारातील अनेक पदार्थांमध्ये सर्रास भेसळ करून जनतेच्या जीवाशी खेळले जाते,हे अत्यंत घातक आहे.” 

   दरम्यान यावेळी व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प ‘नाट्य दर्पण !’  या विषयावर नाट्यात्मक सादरीकरणाच्या सहाय्याने संगमनेर येथील कलावंत सुरेंद्र गुजराथी यांनी गुंफले आहे.   

   सदर व्याख्यानमालेतील तीनही व्याख्यान सत्रांचे प्रास्ताविक व प्रमुख वक्त्यांचा परिचय केंद्र कार्यवाहक प्रा.डॉ.जिभाऊ मोरे यांनी करून दिला,तर मंडळाचे सदस्य डॉ.रवींद्र जाधव व प्रा.किरण सोळसे यांनी तिनही व्याख्यान सत्रांचे सूत्रसंचालन डॉ.एम.बी.खोसे यांनी केले तर व्याख्यानमाला यशस्वी करण्यासाठी रजिस्ट्रार डॉ अभिजीत नाईकवाडे,डॉ.नवनाथ दळवी,रोहित लकारे,प्रा.होन मॅडम आदींनी विशेष परिश्रम घेतले आहे.उपस्थितांचे आभार प्रा.किरण सोळसे यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close