शैक्षणिक
…या महाविद्यालयाचा दोन उद्योगांशी करार !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
आर.जे.एस.कॉलेज ऑफ फार्मसीने उद्योग-शिक्षण सहकार्य बळकट करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत सिन्नर येथील होल्डन मेडिकल लॅबोरेटरीज प्रा.लि.आणि एन. वी.फार्मा (सिन्नर) यांच्याशी सामंजस्य करार केला आहे.करारावर जालिंद्र कानवडे (प्लांट मॅनेजर,होल्डन मेडिकल) आणि निशा बेडीस (क्यू.सी.व्यवस्थापक,एन.वी.फार्मा) यांच्या स्वाक्षऱ्या मोठ्या उत्साहात झाल्या असल्याचे माहिती महाविद्यालयाचे डॉ.प्राचार्य नितीन जैन यांनी दिली आहे.

“या करारामुळे आर.जे.एस.फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना नवोन्मेष,कौशल्यविकास आणि रोजगारक्षमतेच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे”-चांगदेव कातकडे,अध्यक्ष,आर.जे.एस.फाउंडेशन,कोपरगाव.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की,”सन-2019 मध्ये स्थापन झालेल्या आर.जे.एस.कॉलेज ऑफ फार्मसीचा उद्देश हा औषधशास्त्र क्षेत्रात शिक्षण,संशोधन व प्रशिक्षण प्रदान करणे आणि समाजाच्या सेवेसाठी सक्षम,गुणवत्तापूर्ण व्यावसायिक घडविणे असा ठरविण्यात आला होता.होल्डन मेडिकल लॅबोरेटरीज ही अत्याधुनिक व अत्युच्च तंत्रज्ञानाचा वापर करून कॅप्सूल्स,टॅब्लेट्स,पावडर इत्यादी विविध उच्च गुणवत्तेच्या औषधी फॉर्मुलेशन विकसित करणारी आघाडीची कंपनी आहे.तर ही कंपनी अँटिडायबेटिक,अँटिहायपरटेन्सिव्ह आणि अँटी-इन्फ्लेमेटरी प्रकारचे औषधे तयार करून त्यांची युरोपसह आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यात करत आहे.औषधनिर्मिती क्षेत्रातील तज्ज्ञता आणि गुणवत्तेमुळे कंपनीला जागतिक आरोग्य संघटना,जी.एम,पी.आय.एस. ओ.9001-2001,एफ.डी.ए.यांसारखी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्रे तसेच अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
तर एन.वी.फार्मा ही अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आणि ओ.आर.एस.चे उत्पादन,निर्यात आणि पुरवठा करणारी प्रसिद्ध औषधनिर्मिती कंपनी आहे.ग्राहकांच्या समाधानाला प्राधान्य देत दर्जेदार उत्पादने तयार करण्याबाबत कंपनीची विशेष ख्याती आहे.फार्मास्युटिकल गुणवत्ता आणि कौशल्यासाठी एन.वी.फार्मा ही जी.एम,पी.आणि एफ.डी. ए.प्रमाणपत्रे प्राप्त आहेत.या एम.ओ.यू.मुळे विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षण,इंटर्नशिप,संशोधन प्रकल्प,कार्यशाळा आणि कौशल्यविकासाच्या विस्तृत संधी उपलब्ध होणार आहेत.आर.जे.एस.कॉलेज ऑफ फार्मसीचा हा उपक्रम उद्योग-विद्यापीठ सहकार्याचा लक्षवेधी नमुना ठरत असून,विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची माहिती उपप्राचार्या डॉ.उपप्राचार्य उषा जैन यांनी दिली आहे.
या वेळी बोलताना डॉ.नितीन जैन म्हणाले की,”या करारामुळे शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रामधील दुवा अधिक बळकट होणार असून विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षण, संशोधन आणि व्यावहारिक अनुभव घेण्याची संधी मिळेल.जालिंदर कानवडे यांनी विद्यार्थ्यांना होल्डन मेडिकल लॅबोरेटरी उत्पादन,गुणवत्ता नियंत्रण आणि औषधनिर्माण प्रक्रियेबाबत प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्याची तयारी व्यक्त केली आहे.



