जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

कलेतून कमावलेली रक्कम अनाथाश्रमाला,सर्वत्र कौतुक

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   कोपरगाव नजिक असलेल्या कोकमठाण हद्दीतील समता इंटरनॅशनल स्कूल मध्ये दिपावलीनिमित्त ‘आर्ट वोल्कॅनो ‘- 2  ‘हा कलोत्सव संपन्न झाला असून यात विद्यार्थ्याना आपल्या हस्तकलेतून मिळालेली एक लाख रुपयांची रक्कम शिर्डी येथील साई अनाथलयाला प्रदान करण्यात आली आहे.त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

“विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता आणि संवेदनशीलता हीच शिक्षणाची खरी शक्ती आहे.अशा उपक्रमांमुळे विद्यार्थी केवळ बुद्धीमान नव्हे,तर मनानेही समृद्ध होतात”-ओमप्रकाश कोयटे,संस्थापक,समता इंटरनॅशनल स्कूल.

  कोपरगाव नजीक असलेल्या समता इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने विद्यार्थ्यांचा कलागुणांना वाव देण्यासाठी ‘आर्ट वोल्कॅनो ‘- 2  ‘हा कलोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.या उपक्रमाचे उद्घाटन पीपल्स को-ऑप.सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष धरमशेठ बागरेचा यांच्या हस्ते करण्यात आले होते.

   या प्रदर्शन-विक्रीतून विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या आकर्षक हस्तकलेच्या वस्तू विकून मिळालेली १ लाख रुपयांची रक्कम ‘साई आश्रया’ अनाथाश्रमातील निराधारांच्या मदतीसाठी समता इंटरनॅशनल स्कूल च्या वतीने प्रदान करण्यात आली असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

   या उपक्रमाबद्दल समता इंटरनॅशनल स्कूल संस्थापक ओमप्रकाश कोयटे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.त्यावेळी ते म्हणाले की,“विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता आणि संवेदनशीलता हीच शिक्षणाची खरी शक्ती आहे.अशा उपक्रमांमुळे विद्यार्थी केवळ बुद्धीमान नव्हे,तर मनानेही समृद्ध होतात.समाजासाठी काही करण्याची ओढ हेच आमच्या शिक्षणाचे खरे यश आहे.”

    यावेळी कार्यकारी विश्वस्त स्वाती कोयटे म्हणाल्या की,”हा फक्त एक कलोत्सव नाही तर विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती,आत्मविश्वास आणि माणुसकीचा उत्सव आहे. त्यांच्या कलेतून उमटलेली समाजसेवेची भावना हीच दिवाळीच्या खऱ्या प्रकाशाची अनुभूती आहे.”

   सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक शाळेचे प्राचार्य समीर अत्तार यांनी केले आहे.समताचे सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी आणि पालकांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close