शैक्षणिक
महिलांना कायद्याची माहिती आवश्यक-माकुणे

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
वर्तमानात मुलींनी सशक्त होणे गरजेचे असून त्यांनी आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य सांभाळण्यासोबतच कायदे व सुविधांची माहिती जाणून घेतली पाहिजे असे प्रतिपादन कोपरगाव येथील तालुका पोलीस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक वैशाली माकुणे यांनी कोपरगाव येथील महाविद्यालयातील एका कर्यक्रमात बोलताना केले आहे.

“प्रत्येक विद्यार्थिनी आणि महिलेने मनातील पारंपारिक असुरक्षिततेची भावना काढून टाकून स्वत:मध्ये आत्मविश्वास निर्माण करून सबल होण्यासाठी लढा द्यावा आणि जीवनातील ध्येय साध्य करावे”-वैशाली माकुणे,उपनिरीक्षक,कोपरगाव तालुका पोलीस ठाणे.
कोपरगाव येथील के.बी.रोहमारे महाविद्यालय येथे नुकतीच विद्यार्थिनींसाठी सक्षमीकरण,कायदेविषयक जाणीव जागृती कार्यशाळा व समुपदेशन सत्र मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे.त्यावेळी त्या बोलत होत्या.
त्यावेळी पुढे बोलताना म्हणाल्या की,”समाजात महिलांचे स्वत:चे भक्कम स्थान निर्माण करण्यासाठी,महिलांना स्वत:कडे आणि समाजाकडे व्यापक दृष्टिकोनातून पाहण्याची ताकद मिळावी आणि एकमेकींच्या सहभागाने व सहकार्याने सकारात्मक बदलाकडे एकत्रितपणे पुढे जाता यावं यासाठी महिला सक्षमीकरण हा सरकारने आपला महत्वाचा उपक्रम बनवला आहे.त्यासाठी महाविद्यालयातून जनजागृती सुरू आहे.सामाजिक नेतृत्व परिवर्तनाच्या प्रक्रियेला गतीशिल करण्याच्या उद्देशाने एक वर्षाचा “प्रभावी महिला परिवर्तनवादी राजकीय नेतृत्व विकास अभ्यासक्रम” चालविणे व गरजेनुसार विविध विषयावरील प्रशिक्षण व प्रकल्प याअंतर्गत कार्यरत आहेत.स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना पन्नास टकके आरक्षण देण्यात आले आहे.याद्वारे महिला स्थानिक स्वराज्य संस्थेत सहभागी होणार आहेत.महिलांचे हे राजकीय नेतृत्व अधिक सक्षम,विकासाच्या मुद्यांना प्राधान्य देणारे व सर्वसमावेशक असे घडविण्यासाठी संस्था विविध उपक्रमाच्या माध्यमातून मोलाचा हातभार लावत आहे.त्यांनी आगामी काळात आपल्या संरक्षणासाठी कायद्याची माहिती घेणे गरजेचे बनले असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले आहे.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती बालवे यांनी केले.या कार्यक्रमामागची भूमिका,अशा समुपदेशन सत्रांची असलेली आवश्यकता त्यांनी स्पष्ट केली व या अनुषंगाने महाविद्यालय राबवित असलेले उपक्रम विषद केले.
सदर प्रसंगी श्रीमती मुकणे यांचा सत्कार प्रा.मयुरी भोसले यांनी केला.यावेळी प्रा.यास्मिन शेख,प्रा.सायली वायखिंडे,प्रा.श्रावणी आढाव आदी शिक्षिका उपस्थित होत्या.