शैक्षणिक
जिल्हास्तरीय दांडिया नृत्य स्पर्धेत…या विद्यालयाचे यश

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव येथे शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये संपन्न झालेल्या दांडिया नृत्य स्पर्धेत कोकमठाण समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनीय लक्षवेधी विजयी कामगिरीची नोंद केली आहे.जिल्हास्तरीय स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे.यात जिल्ह्यातील तब्बल १५ संघांनी सहभाग घेतला होता.

“हा विजय फक्त एक क्रमांक नाही,तर विद्यार्थ्यांची चिकाटी,प्रयत्न आणि जिद्दीची साक्ष आहे.विद्यार्थ्यांनी मेहनत करून आपले स्वप्न मोठे ठेवावे,यश नक्कीच तुमच्या पायाशी येईल”-स्वाती कोयटे,समता इंटरनॅशनल स्कूल,कार्यकारी विश्वस्त.
नृत्य स्पर्धा ही एक अशी स्पर्धा आहे जिथे नर्तक परिक्षकांसमोर आणि प्रेक्षकांसमोर विविध नृत्य शैली सादर करतात,ज्यामध्ये शास्त्रीय,लोकनृत्य,समकालीन,हिप-हॉप इत्यादींचा समावेश असू शकतो.या स्पर्धांमध्ये नर्तकांचे कौशल्य,सादरीकरण आणि कल्पकता तपासली जाते.या स्पर्धा वैयक्तिक किंवा गट स्वरूपात असू शकतात आणि त्यातून कलाकारांना प्रोत्साहन मिळते व त्यांची प्रतिभा प्रदर्शित होते.कोपरगाव शहरातील शारदा इंग्लिश स्कूल येथे ही स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.त्यात समता इंटरनॅशनल स्कूलने हे यश प्राप्त केले आहे.
या जिल्हास्तरीय स्पर्धेत रुद्राणी गोसावी,अर्णव कुलकर्णी,ईशान कोयटे,जान्हवी भागवानी,अविका डंबीर,निष्ठा संकलेचा,साईशा देशपांडे,सृष्टी वक्ते,ऐश्वर्या माखिजा,राशी थवानी,राजवी मालपुरे,हित ओस्तवाल,श्रियांश सांगळे,मोहन लोंढे,सिद्धांत राजपूत,अर्णव आढाव आदींनी नृत्य कला प्रकारात कला सादर करत यश संपादन केले.
स्पर्धेत विद्यार्थ्यांच्या मेहनतीला आणि सादरीकरणातील अचूकतेला प्रेक्षक व परीक्षकांकडून दाद मिळाली.त्यांच्या या कामगिरीबद्दल बोलताना शाळेचे प्राचार्य समीर अत्तार यांनी “विद्यार्थ्यांच्या चिकाटी, सराव आणि समर्पणामुळे हा विजय शक्य झाला असून,हे यश शिक्षकांच्या मार्गदर्शनाला व पालकांच्या पाठिंब्यालाही समर्पित आहे,” असे सांगत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
या विजयी संघाला नृत्य शिक्षक आदित्य सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभले होते.तसेच प्राथमिक विभाग प्रमुख जिज्ञासा कुलकर्णी यांनी स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना प्रेरित केले. याशिवाय शिक्षक भक्ती बाभूळके,सुनंदा बिडवे,मंगेश गायकवाड यांचेही सहकार्य या यशामागे लाभले होते.समता इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक ओमप्रकाश कोयटे,संदीप कोयटे आदींनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.