शैक्षणिक
… या शाळेत संसदीय चर्चासत्र संपन्न!

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव नजीक असलेल्या कोकमठाण हद्दीत समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये नुकतेच “समता युथ पार्लमेंट २०२५” या संसदीय चर्चा सत्राचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात त्यात शाळेतील इयत्ता ६ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला आहे.

“समता युथ पार्लमेंट २०२५” हा केवळ शालेय उपक्रम नव्हता,तर तो विद्यार्थ्यांच्या नेतृत्वगुणांना वाव देणारा प्रेरणादायी अनुभव ठरला आहे”-स्वाती कोयटे,कार्यकारी विश्वस्तसमता,इंटरनॅशनल स्कूल.
संसदीय शासन पद्धतीत चर्चा आणि विचारविनिमय अत्यंत महत्त्वाचे असते,कारण या प्रक्रियेमुळे सार्वजनिक कल्याणाशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर कायदेमंडळात सविस्तर चर्चा होते,ज्यामुळे योग्य आणि जनतेच्या हिताचे कायदे बनवता येतात,तसेच विरोधी पक्षालाही आवाज उठवण्याची संधी मिळते.याचा अनुभव विद्यार्थी जीवनात येऊन भविष्यात त्यांच्यात नेतृत्व गुण विकसित होण्यासाठी समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात ‘ आध्य फाउंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेची मोलाची भूमिका होती. “विद्यार्थी केवळ अध्ययन केंद्री नसून समाज बदलविणारे सेनानी आहेत” हे ब्रीद त्यांनी या कार्यक्रमातून साकारले होते.संस्थेच्या सह-संस्थापक अनन्या विरकर यांच्या प्रयत्नांमुळे संसदीय सत्राला महत्त्व प्राप्त झाले होते.शाळेचा माजी विद्यार्थी कुलदीप कोयटे याने यात भूमिका निभावली असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
समता इंटरनॅशनल स्कूल संस्थापक ओमप्रकाश कोयटे यांनी विद्यार्थ्यांचे हे सत्र म्हणजे मंत्रिमंडळाच्या कारभाराचा सजीव आरसा असल्याचे सांगितले.प्राचार्य समीर अत्तार यांनी “विद्यार्थ्यांनी लोकशाहीचे मूल्य आत्मसात केले,तर तेच उद्या समाज परिवर्तनाचे खरे वाहक ठरतील” असे प्रतिपादन केले आहे.
या उपक्रमात प्राथमिक विभाग प्रमुख जिज्ञासा कुलकर्णी,पूर्वी श्रीवास यांच्यासह शाळेचा क्रीडा विभाग,कला विभाग,वाहतूक विभाग व शालेय देखभाल विभाग यांनी परिश्रम घेतले. समता स्कूलच्या कार्यकारी विश्वस्त स्वाती कोयटे यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या आहेत.