जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

मोबाईलचा योग्य व कमी वापर हे यशाचे गमक-आवाहन

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

“सरकारी नोकरी मिळवण्यासाठी आयबीपीएस परीक्षेसारखी सारखी दुसरी सोपी व पारदर्शक पद्धती नाही.मैदानावर शारीरिक कसरत व मोबाईलचा योग्य व कमी वापर हे तुमच्या यशाचे गमक ठरू शकत असल्याचे प्रतिपादन संभाजीनगर येथील सारथी एज्यूकेशनचे संचालक अक्षय चोळके यांनी कोपरगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

सदर प्रसंगी संजित कदम यांनीही विद्यार्थ्यांना बँकिंग परीक्षेतील विविध बारकावे सोप्या पद्धतीने समजावून सांगताना आपल्या आई-वडिलांची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी  व मान उंचावण्यासाठी विद्यार्थ्यांनी अधिकारी झालं पाहिजे असेही ते शेवटी म्हणाले आहे. 

कोपरगाव येथील के.जे.सोमैया महाविद्यालयाच्या वतीने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र,वाणिज्य शाखा,विद्यार्थी मार्गदर्शन योजना व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलच्या वतीने आयबीपीएस बँकिंग कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती त्या वेळी ते बोलत होते.

कार्यक्रमासाठी प्रा.सचिन जाधव प्रा.गुडघे,प्रा जगधने प्रा.आढाव मॅडम,प्रा.जगधने,प्रा प्रवीण गुडघे प्रा.सचिन जाधव,प्रा.धनवटे, प्रा.माळी, प्रा. सोनवणे,मयुरी आवारे प्रा.मानसी चव्हाण,  श्रावणी आढाव व महाविद्यालयाचे रजिस्टर डॉ. अभिजीत नाईकवाडे,वाणिज्य शाखा प्रमुखडॉ. संतोष पगारे आदी मान्यवर उपस्थित होते.

सदर प्रसंगी संजित कदम यांनीही विद्यार्थ्यांना बँकिंग परीक्षेतील विविध बारकावे सोप्या पद्धतीने समजावून सांगताना आपल्या आई-वडिलांची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी  व मान उंचावण्यासाठी विद्यार्थ्यांनी अधिकारी झालं पाहिजे असेही ते शेवटी म्हणाले आहे. 

या प्रसंगी महाविद्यालयाचे ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी डॉ.संजय अरगडे यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले आहे.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक प्रा.डॉ.वसुदेव साळुंके यांनी केले तर सूत्रसंचालन विद्यार्थी मार्गदर्शन योजनेचे समन्वयक डॉ.रवींद्र जाधव यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रदर्शन प्रा. विजय सोमासे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close