शैक्षणिक
…या महाविद्यालयात सीईटी कोचिंग क्लासेसचा शुभारंभ

न्युजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान संचलित श्री साईबाबा कनिष्ठ महाविद्यालयात गुरुवारी एमएचटी-सीईटी कोचिंग क्लासेसचा औपचारिक शुभारंभ संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांच्या हस्ते करण्यात आला आहे.

“ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी दर्जेदार मार्गदर्शन मिळावे यासाठी संस्थानने हा उपक्रम हाती घेतला आहे. संस्थानच्या शाळांमधून शिक्षण घेतलेल्या आणि दहावीत ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना या कोचिंगसाठी संपूर्ण मोफत प्रवेश दिला जाणार आहे’-गोरक्षनाथ गडीलकर,मुख्य कार्यकारी अधिकारी,श्री साईबाबा संस्थान,शिर्डी.
या कार्यक्रमास संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे, प्रशासकीय अधिकारी विश्वनाथ बजाज,तसेच आकाश इन्स्टिट्यूटचे अकॅडमिक स्टेट हेड अभिषेक सिन्हा,डेप्युटी रीजनल मॅनेजर पुनीत मेहरा आणि बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर अमोल भांबरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना गाडीलकर यांनी सांगितले की,“ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी दर्जेदार मार्गदर्शन मिळावे यासाठी संस्थानने हा उपक्रम हाती घेतला आहे. संस्थानच्या शाळांमधून शिक्षण घेतलेल्या आणि दहावीत ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना या कोचिंगसाठी संपूर्ण मोफत प्रवेश दिला जाणार आहे.त्यांचे संपूर्ण शुल्क संस्थानच्या वतीने भरले जाईल.तसेच,एकल पालक असलेले किंवा अनाथ आणि ८० टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त केलेले विद्यार्थी देखील या सुविधेस पात्र राहतील.इतर विद्यार्थ्यांसाठी संस्थानकडून ५० टक्के शुल्क सवलत दिली जाणार आहे.”
यावेळी श्री.दराडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की,“ही संधी भाविकांच्या श्रद्धेच्या आणि घामाच्या पैशातून निर्माण झालेली आहे.त्यामुळे ती जबाबदारीने स्वीकारा आणि अभ्यासात यश मिळवा.”
आकाश इन्स्टिट्यूटचे राज्य प्रमुख अभिषेक सिन्हा यांनी संस्थानच्या उपक्रमाचे कौतुक करत सांगितले,“विद्यार्थ्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन देण्यासाठी आम्ही पूर्णतः कटिबद्ध आहोत.यशासाठी सातत्य,मेहनत आणि आत्मविश्वास या तीन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.”
सदर कार्यक्रमास संस्थेच्या शैक्षणिक संकुलातील प्राचार्य आसिफ तांबोळी,अभयकुमार दुनाखे,शिल्पा पुजारी,शिक्षकवर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य विकास शिवगजे यांनी केले तर आभार प्रदर्शन आकाश इन्स्टिट्यूटचे बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर अमोल भांबरे यांनी केले आहे.