शैक्षणिक
…या मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

न्युजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव येथील सावित्रीबाई फुले प्रतिष्ठान व चॅरिटेबल फाउंडेशन ट्रस्टचे विश्वस्त सचिन पवार व अर्जुन साळुंके या दोन तरुणांच्या एक लाख रुपयांच्या आर्थिक सहकार्याने एकल महिलांच्या मुलांना प्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांच्या हस्ते मदत दिली असल्याची माहिती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा संगीता मालकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

शालेय शालेय पुरवठा (शालेय शालेय पुरवठा) शालेय भाषेत शिकायला आणि शिक्षकांना प्रभावीपणे शिकवते.त्यात पुस्तके,त्यात पेन्सिल आणि इतर शैक्षणिक साहित्याचा समावेश होतो.योग्य शालेय साहित्याची शैक्षणिक सुधारणा आणि शिक्षकांना अधिक प्रभावीपणे शिक्षण देण्यासाठी उपयुक्त ठरते.त्याचे महत्व ओळखून या दोन्ही संस्थानी एकल महिलांच्या पाल्यांना शालेय साहित्य देण्याचा निर्णय घेतला आहे.त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
वर्तमानात शालेय वर्षे सुरू झाले असून विद्यार्थी आणि पालक यांची शाळेचे पुस्तके आणि वह्या घेण्याची लगबग सुरू आहे.अनेक पालक आपल्या विद्यार्थ्याना आर्थिक ओढातानीमूळे शालेय खर्च करू शकत नाही अशा वेळी कोपरगाव येथील महात्मा सावित्रीबाई फुले प्रतिष्ठान आणि चॅरिटेबल फाऊंडेशन ट्रस्टने पुढाकार घेतला आहे.व एकल महिलांच्या मुलांना शालेय साहित्य देण्याचा निर्णय घेतला आहे.यात जवळपास ११३ विद्यार्थ्यांची जबाबदारी संबधित दोन्ही संस्थानी संयुक्तपणे संस्थेने घेतली आहे.

दरम्यान आरसीएफ कंपनी मुंबई व जगदंबा फाउंडेशन अंतर्गत साऊ एकल महिला समिती एच.सी.जी.मानवता कॅन्सर सेंटर नाशिक,सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठान कोपरगाव लिओ व लायनेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने लायन्स पार्क या ठिकाणी एकल महिलांचे मोफत आरोग्य तपासणी शिबिर पार पडले.या शिबिरामध्ये महिलांची मॅमोग्राफी व पॅप स्मिअर तसेच ओरल स्क्रीनिंग दंत तपासणी करण्यात आली.९७ महिलांनी यामध्ये सहभाग नोंदवला असल्याची माहिती डॉ.अमोल अजमेरे यांनी आमच्या प्रतींनिधीस दिली आहे.यावेळी यावेळी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.अमोल अजमेरे,स्त्री रोग तज्ञ डॉ.रोशनी आढाव डॉ.अंकित कृष्णाणी आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान त्यात प्रत्येक विद्यार्थ्याला स्कूल बॅग,टिफिन पाणी बॉटल,एक डझन वही व कंपास बॉक्स असे साहित्य वाटप केले आहे.त्यामुळे एकल महिलांनी समाधान व्यक्त केले आहे.यावेळी हेरंब कुलकर्णी एकल महिला समिती महाराष्ट्र राज्य निमंत्रक व त्यांच्या धर्मपत्नी प्रतिभा कुलकर्णी यांच्या हातून या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सदर प्रसंगी कोपरगाव येथील ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे कार्याध्यक्ष विजय बंब,जवाहर शहा,उत्तमभाई शहा आदी मान्यवर उपस्थित होते.सदर प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती मुळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार श्रद्धा शिंदे यांनी मानले आहे.



