शैक्षणिक
…या महाविद्यालयात नवीन अभ्यासक्रम सुरू !

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव येथील के.जे.सोमैया महाविद्यालयात बी.एस्सी.इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग (ए.आय.& एम.एल.), बी.एस्सी.इन डेटा सायन्स व एम.एस्सी.इन ऍनालिटिकल केमिस्ट्री हे नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी महाराष्ट्र शासनाची अंतिम मान्यता मिळाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ.विजय ठाणगे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना येथे दिली आहे.

“उपरोक्त अभ्यासक्रम हा तीन वर्षांचा असून यासाठी संस्थेने आर्टीफिशियल इंटलिजन्स विषयाची अद्यावत प्रयोगशाळा देखील उभारण्यात आली आहे.ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून संस्थेने अत्यंत माफक फी मध्ये वरील अभ्यासक्रम शिकवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे”- डॉ.विजय ठाणगे,प्राचार्य,के.जे. सोमैया महाविद्यालय,कोपरगाव.
मशीन लर्निंग (एम.एल.) हे प्रोग्राम्स किंवा सिस्टीम्सच्या अभ्यासाचे क्षेत्र आहे जे मॉडेल्सना इनपुट डेटावरून भाकित करण्यासाठी प्रशिक्षित करतात.एम.एल.काही तंत्रज्ञानांना सामर्थ्य देते जे आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत,ज्यात नकाशे,भाषांतर अॅप्स आणि गाण्याच्या शिफारसींचा समावेश आहे.या तंत्रज्ञानाचे वर्णन करण्यासाठी तुम्हाला “कृत्रिम बुद्धिमत्ता” किंवा ए.आय.हा शब्द देखील ऐकू येईल.जरी कधीकधी ते परस्पर बदलले जात असले तरी,औपचारिकरित्या,एम.एल.हे ए.आय.चे एक उपक्षेत्र मानले जाते.कृत्रिम बुद्धिमत्ता हा एक गैर-मानवी कार्यक्रम किंवा मॉडेल आहे जो प्रतिमा निर्मिती किंवा उच्चार ओळखणे यासारखी अत्याधुनिक कामे करू शकतो.याचे आगामी काळात मोठे महत्व ओळखून अनेक संस्थानी आपल्या महाविद्यालयात अभ्यासक्रम सुरू केले आहे.त्याला के.जे.सोमैया महाविद्यालय अपवाद नाही.
याविषयी अधिक माहिती देताना प्राचार्य डॉ.ठाणगे म्हणाले की,“उपरोक्त अभ्यासक्रम हा तीन वर्षांचा असून यासाठी संस्थेने आर्टीफिशियल इंटलिजन्स विषयाची अद्यावत प्रयोगशाळा देखील उभारण्यात आली आहे.ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून संस्थेने अत्यंत माफक फी मध्ये वरील अभ्यासक्रम शिकवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.हा अभ्यासक्रम पूर्ण करून पदवी व पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या १००% संधी आहेत.आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या नवीन अभ्यासक्रमात पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देश-विदेशातील नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीच्या व्यापक संधी उपलब्ध होतील.तंत्रज्ञानाच्या बदलत्या काळात ‘ए. आय.’ चा प्रभाव वाढत असून तरुणांना त्यादृष्टीने आय.टी.,उद्योग-व्यवसाय,बँकिंग,शेती,मेडिकल आदी क्षेत्रात ए.आय.व डेटा सायन्सचा वापर झपाट्याने वाढत असल्याने तरुणांनी त्या दिशेने पाऊल टाकणे महत्त्वाचे ठरणार आहे.”
कोपरगाव शहर आणि परिसरातील तरुणांनी या संधीचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष अशोक रोहमारे यांनी केले आहे. रोजगाराभिमुख,कालसुसंगत आणि करिअरच्या व्यापक संधी उपलब्ध करून देणाऱ्या अभ्यासक्रमांना महाराष्ट्र शासनाची परवानगी मिळाल्याने संस्थेचे अध्यक्ष अशोक रोहमारे,सचिव ऍड.संजीव कुलकर्णी,विश्वस्त संदीप रोहमारे यांनी समाधान व्यक्त केले आहे.