शैक्षणिक
…या विद्यार्थिनीची आंतरराष्ट्रीय इंटर्नशिपसाठी निवड

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव येथील के.जे.सोमैया महाविद्यालयाच्या संगणक विज्ञान शाखेची विद्यार्थिनी कु.मानसी अरविंद पांडे हिची जुलै ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीसाठी तैवान येथे होणाऱ्या सी.सी.यू.आंतरराष्ट्रीय इंटर्नशिप कार्यक्रमासाठी निवड झाली असल्याचे तसेच महाविद्यालयातील विविध विद्याशाखांच्या एकूण ३० विद्यार्थ्यांची हैदराबाद,पुणे व नाशिक येथील विविध कंपन्यांमध्ये विविध पदांवर निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ.विजय ठाणगे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

“ज्या कंपन्यांमध्ये महाविद्यालयाच्या उपरोक्त विद्यार्थ्यांची नोकरी आणि ट्रेनिंगसाठी निवड झाली आहे. त्यामध्ये हेट्रो फार्मासिटिकल लिमिटेड हैदराबाद,किरण ॲकॅडमी पुणे,टेक्नोग्रोथ सॉफ्टवेअर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड पुणे,समर्थ फाउंडेशन नाशिक आदी नामांकित कंपन्यांचा समावेश आहे.
यासंदर्भात अधिक माहिती देताना महाविद्यालयाच्या ट्रेनिंग आणि प्लेसमेंट असिस्टन्स सेलचे प्रमुख डॉ.संजय अरगडे म्हणाले की,”ज्या कंपन्यांमध्ये महाविद्यालयाच्या उपरोक्त विद्यार्थ्यांची नोकरी आणि ट्रेनिंगसाठी निवड झाली आहे. त्यामध्ये हेट्रो फार्मासिटिकल लिमिटेड हैदराबाद,किरण ॲकॅडमी पुणे,टेक्नोग्रोथ सॉफ्टवेअर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड पुणे,समर्थ फाउंडेशन नाशिक आदी नामांकित कंपन्यांचा समावेश आहे.त्याचबरोबर आणखी एक विशेष बाब म्हणजे महाविद्यालयाच्या ३७१ विद्यार्थ्यांची महाज्योती शिष्यवृत्तीसाठी आणि इतर ३९ विद्यार्थ्यांची अन्य शिष्यवृत्तींसाठी निवड झाल्याने याबाबत समाधान वाटत आहे.
सोमैया महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे,सचिव एड्.संजीव कुलकर्णी,विश्वस्त संदीप रोहमारे, प्राचार्य डॉ. विजय ठाणगे,रजिस्ट्रार डॉ.अभिजीत नाईकवाडे यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
दरम्यान या निवड झालेल्या उपरोक्त सर्व विद्यार्थ्यांना डॉ.वसुदेव साळुंके,डॉ.रवींद्र जाधव,डॉ.निलेश पोटे आदींचे मार्गदर्शन लाभले तसेच प्रा.विजय सोमासे,प्रा.अजित धनवटे, प्रा.सुनील गुंजाळ व प्रा.स्वागत रणधीर या सर्व प्राध्यापकांनी प्लेसमेंट कॅम्पसाठी विशेष परिश्रम घेतले आहे.