शैक्षणिक
…या विद्यालयाचा शालांत परीक्षा निकाल घोषित

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एस.एस.सी.परीक्षेमध्ये कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी,संचालित गौतम पब्लिक स्कूलचा निकाल १००% लागला असून गौतम पब्लिक स्कूलने आपली १९ वर्षापासून १००% निकालाची ऐतिहासिक परंपरा याहीवर्षी अबाधित ठेवली असल्याची माहिती प्राचार्य नूर शेख यांनी दिली आहे.

महाराष्ट्र स्टेट बोर्डाने फेब्रुवारी-मार्च २०२५ घेतलेल्या एस.एस.सी.परीक्षेसाठी गौतम पब्लिक स्कूलचे एकूण १२० विद्यार्थी प्रविष्ट झालेले होते.यामध्ये ९०% पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी गुण मिळविले आहे.तर ७५% ते ९०%च्या वर ६६ विद्यार्थी, ६०% ते ७४ % च्यावर ४४ विद्यार्थी तर ६०% पर्यंत ०९ विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण होवून उज्वल यश संपादन केले आहे. यामध्ये प्रथम पाच विद्यार्थी पुढीलप्रमाणे असून यामध्ये कु.साक्षी विश्वनाथ वाबळे या विद्यार्थिनीने ९१.६० % गुण मिळवून शाळेत प्रथम येण्याचा मान मिळविला आहे.तर सार्थक संजय लगड या विद्यार्थ्याने ९०.२०% गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला आहे.कु.ईश्वरी संदीप बोरनर हिने ८९.००% गुण मिळवून तृतीय क्रमांक व शोयब मुजीब सय्यद या विद्यार्थ्याने ८८.२०% गुण मिळवून चतुर्थ तर कृष्णा खंडेराव पानगव्हाणे या विद्यार्थ्याने ८७.४०% गुण मिळवून पाचवा क्रमांक मिळविला आहे.
दरम्यान या यशस्वी विद्यार्थ्यांचे कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन माजी आ.अशोक काळे,विश्वस्त आ.आशुतोष काळे,सचिव चैताली काळे, व्हा.चेअरमन छबुराव आव्हाड,संस्था निरीक्षक नारायण बारे,शाळेचे प्राचार्य नूर शेख आदींनी अभिनंदन केले आहे.