शैक्षणिक
मंथन राज्यस्तरीय परीक्षेत…या दोन विद्यार्थिनींचे मोठे यश !

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी )
मंथन राज्यस्तरीय सामान्यज्ञान परीक्षेचा एकूण ३०० गुणाचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यात कोपरगाव तालुक्यातील जवळके येथील शेतकरी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थीनी कू.ऋत्वी गणेश थोरात हीने १८२ गुण मिळवून राज्यात ५५ वा तर जिल्ह्यात ४५ तर केंद्रात पहिला क्रमांक मिळवला आहे तर तिची दुसरी सहकारी असलेली विद्यार्थीनी कु.अदिती प्रकाश थोरात हीने ३०० पैकी १८० गुण मिळवून राज्यात ५६ वा तर जिल्ह्यात ४६ तर केंद्रात द्वितीय क्रमांक मिळवला आहे.यशस्वी विद्यार्थिनींचे सर्वत्र कौतुक होत आहे.

विज्ञान आणि गणिताशी संबंधित विषयांमध्ये रस असलेल्या विद्यार्थ्यांना ओळखण्यासाठी मंथन ही परीक्षा घेतली जाते.भविष्यातील अनेक स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी ही परीक्षा घेतली जाते.या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची पातळी आणि दर्जा ओळखला जातो.त्यात कुमारी ऋत्वि थोरात व अदिती थोरात यांनी हे यश मिळवले आहे.
मंथन ही राज्यस्तरीय सामान्यज्ञान परीक्षा असून या परीक्षा आयोजित करण्याचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान आणि गणिताची आवड निर्माण करणे आणि त्यांचे कौशल्य ओळखणे हे आहे.सहावी ते अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेतली जात असते.विज्ञान आणि गणिताशी संबंधित विषयांमध्ये रस असलेल्या विद्यार्थ्यांना ओळखण्यासाठी ही परीक्षा घेतली जाते.भविष्यातील अनेक स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी ही परीक्षा घेतली जाते.या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची पातळी आणि दर्जा ओळखला जातो.तिचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यात कोपरगाव तालुक्यातील जवळके येथील दोन विद्यार्थिनींनी मोठे यश मिळवले असल्याची माहिती हाती आली आहे.

दरम्यान कु.ऋत्वि गणेश थोरात व अदिती प्रकाश थोरात या दोन्ही विद्यार्थिनींचे अभिनंदन शेतकरी संघटनेचे प्रदेश प्रसिध्दी प्रमुख नानासाहेब जवरे,जलसंपदा विभागाचे माजी उपअभियंता एस.के.थोरात,माजी सरपंच वसंत थोरात,जवळके ग्रामपंचायतीच्या सरपंच सारिका विजय थोरात,माजी उपसरपंच गोरक्षनाथ थोरात,डी.के.थोरात,अशोक शिंदे,उत्तमराव थोरात,ग्रामपंचायतीचे सदस्य भाऊसाहेब थोरात,मीना विठ्ठल थोरात,वनिता रखमा वाकचौरे,इंदुबाई नवनाथ शिंदे,रोहिणी गोरक्षनाथ वाकचौरे,अरुण थोरात,गणेश थोरात ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जवळके येथील मुख्याध्यापक दत्तात्रय मैड,शिक्षक निवृत्ती बढे आदींनी केले आहे.