शैक्षणिक
…या विद्यालयाचे एन.एम.एम.एस परीक्षेत मोठे यश

न्युजसेवा
माहेगाव देशमुख-(प्रतिनिधी)
राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी डिसेंबर २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत कोपरगाव तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी लक्षवेधी यश संपादन केले असून सहा विद्यार्थ्यांची केंद्रशासन शिष्यवृत्तीसाठी तर बारा विद्यार्थ्यांची सारथी शिष्यवृत्ती साठी निवड झाली आहे.

केंद्र शासनाच्या शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांना दरवर्षी १२ हजार रुपये याप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्याला चार वर्षात ४८ हजार रुपये शिष्यवृत्ती प्राप्त होणार असून सारथी शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांना दरवर्षी ०९ हजार ६०० प्रमाणे चार वर्षात एका विद्यार्थ्याला ३८ हजार ४०० एवढी शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे.
केंद्रशासनाच्या शिष्यवृत्ती प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये नरोडे तेजस राजाराम,खर्डे श्रेयस ज्ञानेश्वर,कोळपे आदिश अरुण,शेरमाळे साई संजय,पावरा ओम रतिलाल,गायकवाड आर्यन संदीप,यांचा समावेश असून सारथी शिष्यवृत्तीसाठी ढोमसे युवराज रवींद्र,धोंड शर्वील सतीश,गुंड अभय गणेश,हिंगे आदित्य भाऊसाहेब,कोकाटे साई दिगंबर,लांडगे प्रद्युम्न सतीश,लांडगे प्रणव सुनील,वाबळे सिद्धार्थ मनोज,शेलार साई अनिल,म्हस्के ओंकार गणेश,गोरडे प्रथमेश गोरख,गायकवाड प्रज्वल सचिन या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

केंद्र शासनाच्या शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांना दरवर्षी १२ हजार रुपये याप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्याला चार वर्षात ४८ हजार रुपये शिष्यवृत्ती प्राप्त होणार असून सारथी शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांना दरवर्षी ०९ हजार ६०० प्रमाणे चार वर्षात एका विद्यार्थ्याला ३८ हजार ४०० एवढी शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विभागीय अध्यक्ष आशुतोष काळे,विद्यालयाचे प्राचार्य प्रकाश चौरे,उपमुख्याध्यापक देविदास माने,पर्यवेक्षक सच्चिदानंद झावरे,ज्येष्ठ शिक्षक रविंद सानप,स्थानिक स्कूल कमिटी अध्यक्ष व सदस्य,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य,शिक्षक पालक संघ अध्यक्ष व सदस्य,माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष व सदस्य तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि शिक्षण प्रेमी पालक,ग्रामस्थ आदींनी अभिनंदन केले आहे.विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख योगेश ठाकरे,गणेश खाडे,इब्राहिम गावित,विशाल नंदनवार व इतर सर्व सेवकांचे मार्गदर्शन लाभले होते.