जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

…या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दिल्लीत फडकविला झेंडा

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी

   दिल्ली येथील भारतीय औद्योगिक संस्था (आय.आय.टी) आयोजित इ.डी.सी.अंतर्गत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या एल.एफ.आर.रोबोटिक्स स्पर्धेत अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील समता इंटरनॅशनल स्कूलच्या ‘निऑन नेव्हीगेटर्स’ संघाने मिळालेली संधी स्वीकारत ‘सेकंड रनर अप’ चा मान मिळवत आय.आय.टी.त समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी समताचा झेंडा फडकवत लक्षवेधी यश संपादन केले आहे.


     
   निऑन नेव्हीगेटर्स संघात दृष्टी लोकचंदानी,सिद्धेश ठोंबरे,जयेश वाघ,ॲना वेस्ली,आयुषिका कुमार,सुयश शिंदे यांचा समावेश होता.या स्पर्धेत १३८ संघांनी सहभाग नोंदविला होता. १ हजारच्या आसपास या स्पर्धेत विद्यार्थी सहभागी झाले होते.
      
   नवनवीन उपक्रमांचे केंद्र असलेल्या दिल्ली येथील आयआयटी देशातील तरुणांना अमर्याद शोध घेण्यासाठी प्रेरित करत असते.या यशामुळे समता इंटरनॅशनल स्कूलच्या इतर विद्यार्थ्यांना देखील प्रेरणा मिळाली असून ही विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी निर्माण झाली असल्याचे  मानले जात आहे.यश संपादन केलेल्या या विद्यार्थ्यांना समता इंटरनॅशनल स्कूलचे आयटी विभाग प्रमुख उदय पाटील व विभागातील शिक्षकांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले होते.
    
   समता इंटरनॅशनल स्कूलच्या या यशस्वी विद्यार्थ्यांचे स्कूलचे संस्थापक ओमप्रकाश कोयटे,कार्यकारी विश्वस्त स्वाती संदीप कोयटे,शालेय व्यवस्थापन समिती सदस्य,प्राचार्य डॉ.समीर अत्तार,कार्यालयीन अधीक्षक सुरेश शिंदे,पालक वर्ग,शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आदींनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close