शैक्षणिक
यश प्राप्तीसाठी शिक्षण,ज्ञान,कौशल्य आवश्यक-धुमाळ

न्युजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
वर्तमानात काळात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना यश प्राप्तीसाठी शिक्षण,आरोग्य,ज्ञान,कौशल्य,दृष्टिकोन या गोष्टी महत्त्वाच्या असल्याचे प्रतिपादन अहिल्यानगर येथील सुप्रसिद्ध उद्योजक एन.बी.धुमाळ यांनी नुकतेच केले आहे.

“श्री.सद्गुरू गंगागिरिजी महाराज या महाविद्यालयाला नॅक मूल्यांकनात A++ग्रेड मिळून जे मोठे यश मिळवले आहे.हे यश विद्यार्थी,शेतकरी विविध घटकांना उपयुक्त होईल”-ऍड.भगीरथ शिंदे,उपाध्यक्ष,रयत शिक्षण संस्था,सातारा.
रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरू गंगागिरिजी महाराज महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक व सुशीलाबाई (माई) शंकरराव काळे आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा पारितोषिक वितरण’ समारंभ नुकताच संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष ॲड.भगीरथ शिंदे हे होते.
सदर प्रसंगी या कार्यक्रमासाठी महेंद्रकुमार काले,महाविद्यालय समितीचे सदस्य डॉ.ज्ञानेश्वर वाकचौरे,महाविद्यालयातील कार्यालयीन अधीक्षक,सर्व शिक्षक,शिक्षकेतर सेवक व मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर प्रसंगी ॲड.भगीरथ शिंदे यांनी म्हटले आहे की,”महाविद्यालयाला नॅक मूल्यांकनात A++ ग्रेड मिळून जे मोठे यश मिळवले आहे.हे यश विद्यार्थी,शेतकरी विविध घटकांना उपयुक्त होईल असा एक आगळावेगळा प्रकल्प महाविद्यालयात राबविण्याचे रयतच्या उच्चस्तरावर ठरत असल्याचेही त्यांनी सांगितले.याबरोबरच महाविद्यालयात पारितोषिक वितरण कार्यक्रम दरवर्षीच होत असला तरी,प्रत्येक वर्षीचे पारितोषिक विजेते वेगळे असतात.त्यामुळे त्यांच्यासाठी याला विशेष महत्त्व असल्याचा उल्लेख करून,त्यांनी सर्वच विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
यावेळी गुणवंत प्राध्यापक प्रा.डॉ.देविदास रणधीर (रिसर्च प्रोजेक्ट) प्रा.डॉ.संगीता दवंगे,प्रा.काजल साळुंके,प्रा.गणेश सोनवणे,प्रा.अश्विनी पाटोळे,मोरेश बांगर (नेट,सेट परीक्षा उत्तीर्ण),प्रा.डॉ.बाबासाहेब शेंडगे( प्रा.डॉ.र.बा.मंचरकर स्मृती पुरस्कार २०२४), डॉ.वंदना घोडके (पी.एच.डी पदवी प्राप्त),प्रा.डॉ.रावसाहेब दहे (पी.एच.डी.पदवी व संदर्भ पुस्तक प्रकाशन) प्रा.डॉ.सीमा चव्हाण (पेटंट),डॉ.चंद्रभान चौधरी,प्रा.डॉ.अर्जुन भागवत,प्रा.सचिन सोनवणे,प्रा.किरण पवार,प्रा.डॉ.विशाल पवार (पुस्तक प्रकाशन),प्रा.अमोल चंदनशिवे,(पर्यावरण शिक्षण व जल सुरक्षा या विषयाच्या पाठ्यपुस्तक निर्मितीसाठी अभ्यास मंडळ सदस्य पदी निवड) प्रा.डॉ.मोहन सांगळे, प्रा.किशोर पाटील व श्रीमती.रेखा जानराव (आदर्श सेवक पुरस्कार) कु.आस्मा पठाण,(आदर्श विद्यार्थी पुरस्कार) आदींचा सन्मान करण्यात आला आहे.
यानंतर सुशिलाबाई शंकरराव काळे (माई )आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांच्या पारितोषिकांची घोषणा प्रा.हिंगे यांनी केली त्यात प्रथम क्रमांक- शुभम मंगेश सरदेसाई(श्रीमान भागोजी शेठ खीर लॉ कॉलेज रत्नागिरी),द्वितीय क्रमांक-प्राप्ती दीपक बुधवंत(के.बी.रोहमारे जुनिअर कॉलेज,कोपरगाव),तृतीय क्रमांक-कु.कोमल नरेंद्र शेलार (एस.एस.जी.कॉलेज,मालेगाव कॅम्प मालेगाव) आदींचा समावेश आहे.तर उत्तेजनार्थ पारितोषिके-प्रथमेश धायगुडे रायगड, कु. सिद्धी बाफना पाथर्डी,वसुधा पाटील पुणे आदींना देण्यात आली आहे.याशिवाय तर ‘फिरता-स्मृती करंडक’. कु.कोमल नरेंद्र शेलार व प्रशांत चिंतामण बेले (एस.एस.जी.कॉलेज,मालेगाव कॅम्प मालेगाव) यांना बहाल करण्यात आला.यानंतर कला,क्रीडा,सांस्कृतिक व शैक्षणिक विभागामध्ये विविधप्रसंगी यश प्राप्त केलेल्या आणि आपापल्या वर्गात प्रथम आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.माधव सरोदे यांनी केले तर महाविद्यालयाचे अहवाल वाचन प्रा.अरुण देशमुख यांनी केले तर उपस्थितांचे आभार कु.साक्षी सवई यांनी मानले आहे.