शैक्षणिक
रयत टॅलेंट परीक्षेचा निकाल जाहीर …!

न्युजसेवा
माहेगाव-(प्रतिनिधी)
रयत शिक्षण संस्थेमार्फत घेतल्या जाणाऱ्या रयत टॅलेंट सर्च (R.T.S.) या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून या परीक्षेच्या निकालात कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव,गौतमनगर येथील रयत शिक्षण संस्थेच्या राधाबाई काळे कन्या विद्यामंदिर,कोळपेवाडी या शाळेच्या विद्यार्थिनींनी लक्षवेधी यश संपादित केले आहे.त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सन-२०२४-२५ या शैक्षणिक वर्षात रयत प्रज्ञाशोध परीक्षेसाठी( R.T.S.) विद्यालयातील ६३ विद्यार्थिनी प्रविष्ठ झाल्या होत्या.त्यापैकी विशेष प्राविण्य श्रेणी २ प्रथम श्रेणी प्राप्त ५,द्वितीय श्रेणी प्राप्त ९,तृतीय श्रेणी प्राप्त ३५ अशा एकूण ५१ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत.
इतर स्पर्धा परीक्षांच्या तुलनेत कठीण समजल्या जाणाऱ्या या परीक्षेत देखील यश मिळवून विद्यालयाने उत्तम निकालाची उज्ज्वल परंपरा कायम ठेवली आहे.
दरम्यान कु.सिद्धी अनिल पानगव्हाणे ही विद्यार्थिनी १५४ गुण मिळवून शिष्यवृत्ती मुलाखतीस पात्र ठरली आहे,तर कु.आराध्या रवी कांदळकर हिने १४८ गुण मिळवून विशेष प्राविण्य श्रेणी प्राप्त केली आहे.विद्यालयाच्या या यशस्वी विद्यार्थिनींचे व मार्गदर्शक शिक्षकांचे माजी आ.अशोक काळे,रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागीय अध्यक्ष आ.आशुतोष काळे आदींनी अभिनंदन केले आहे.
या सर्व विद्यार्थिनींना विद्यालयाच्या प्राचार्या हेमलता गुंजाळ,उपमुख्याध्यापक मधुकर गोडे,प्रभारी पर्यवेक्षक सुरेश खंडिझोड विभागप्रमुख प्रशांत मेढे,विषय शिक्षक राजेश रणवीरकर,सचिन सुरजूसे,रामदास वाघमारे,मनोहर लोहकरे,शैला जोशी,गणेश देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले होते.