जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

…या महाविद्यालयात महिला दिन साजरा

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

“आजच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपला देश आणि समाज प्रगतीपथाकडे वाटचाल करीत असताना त्यात समस्त स्त्रियांचे योगदान नक्कीच उलेखनीय असे आहे.तरी देखील आजही असंघटित क्षेत्रात महिलांच्या संदर्भातील ‘समान काम समान मोबदला’ हे तत्त्व स्विकारून देखील आजही स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने वेतन दिले जात नाही.या स्त्रियांच्या संदर्भातील विधायक बदलांचे वाहक बनण्याची गरज असल्याचे प्रतिपादन कोपरगाव येथील प्रभारी प्राचार्य डॉ.विजय ठाणगे यांनी एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

सदर प्रसंगी शैक्षणिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्राध्यापिका तसेच विविध शैक्षणिक तसेच क्रीडाप्रकारात नैपुण्य दाखविणाऱ्या विद्यार्थिनींचा देखील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे.

   कोपरगाव येथील स्थानिक के.जे.सोमैया महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व महिला सबलीकरण कक्षाच्या संयुक्त विद्यमाने’आंतरराष्ट्रीय महिला दिन’ मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते.

   सदर कार्यक्रमासाठी डॉ.संतोष पगारे डॉ.जिभाऊ मोरे,डॉ.शैलेंद्र बनसोडे,डॉ.बाबासाहेब गव्हाणे,डॉ.गणेश चव्हाण डॉ.वसुदेव साळुंके आदी प्राध्यापकांची प्रमुख उपस्थिती होती.

    सदर प्रसंगी शैक्षणिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्राध्यापिका तसेच विविध शैक्षणिक तसेच क्रीडाप्रकारात नैपुण्य दाखविणाऱ्या विद्यार्थिनींचा देखील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.त्यामध्ये प्रा.मिलीता वंजारे,प्रा.नन्नवरे,प्रा.जांभुंरकर,प्रा.मोरे,प्रा.खाडे आदी प्राध्यापिकांचा तसेच कु मेघा सोनवणे,अनुजा पवार,कु. प्रियंका जोगदंड,कु.सुप्रिया गायकवाड या विद्यार्थिनींचा समावेश होता.याप्रसंगी कु.प्राप्ती बुधवंत,प्रा.रोहिणी घुगे व यांनी काव्यवाचन व मनोगते व्यक्त केली आहे.

  सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला सबलीकरण कक्षाच्या प्रमुख डॉ.नीता शिंदे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.कोमल अडसरे यांनी तर आभार महिला सबलीकरण कक्षाच्या सदस्य डॉ.सुरेखा भिंगारदिवे यांनी मानले.

   सदर कार्यक्रमासाठी यशस्वीतेसाठी प्रा.मिलिता वंजारे,प्रा.जयश्री खंडिजोड,प्रा.सुवर्णा चव्हाण आदींनी परिश्रम घेतले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close