शैक्षणिक
शिक्षणाचे माध्यमासाठी मातृभाषाच हवी-…यांची मागणी

न्युजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
“शिक्षणाचे माध्यमासाठी मातृभाषाच पाहिजे.परंतु आपली मातृभाषा मराठी असून देखील आपण दिवसेंदिवस मातृभाषेपासून दूर जात आहोत ही नक्कीच खेदाची बाब आहे.आपण मातृभाषेवर प्रेम करायला हवे असे प्रतिपादन श्रीरामपूर येथील माजी मराठी विभाग प्रमुख डॉ.शीला गाढे यांनी नुकतेच केले आहे.

“आपण मराठी भाषेचे केवळ विद्यार्थी व अभ्यासक न राहता प्रचारक आणि प्रसारक देखील बनले पाहिजे.त्यासाठी आपल्याला भरपूर वाव असून आपण मातृभाषेबरोबरच इतर भाषांवर देखील प्रभुत्व मिळवू शकतो”-प्राचार्य विजय ठाणगे,सोमय्या महाविद्यालय,कोपरगाव.
कोपरगाव येथील स्थानिक के.जे.सोमैया महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व मराठी विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी भाषा गौरव दिन आयोजित केला होता त्यावेळी त्या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या.अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजय ठाणगे होते.
सदर समारंभासाठी हिंदी विभाग प्रमुख डॉ.जिभाऊ मोरे,वाणिज्य शाखाप्रमुख डॉ.संतोष पगारे,अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ.सुरेखा भिंगारदिवे,प्रा.वर्षा आहेर,प्रा.रावसाहेब गायकवाड,प्रा.नवनाथ वैद्य,प्रा.किरण सोळसे,प्रा.विजय खांदिझोड आदी मान्यवर उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना त्या म्हणाल्या की,”शुद्ध मराठीतून बोलण्यासाठी आपण चौफेर वाचनाची गोडी स्वतःमध्ये निर्माण केली पाहिजे तरच आपली मातृभाषा मराठी मोठी होईल,त्यासाठी विद्यार्थ्यांनी मराठी ग्रंथांवर मनापासून प्रेम केले पाहिजे.छत्रपती शिवाजी महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,संत तुकाराम आदी महापुरुषांच्या ग्रंथांचे अध्ययन, चिंतन आणि मनन केले पाहिजे.जिजाऊ माँ साहेबांना पाच ते सहा भाषा अवगत होत्या.आज आपण २१ व्या शतकात जगत असून देखील आपल्याला एकाध-दुसरीच भाषा येते.मराठी भाषेचा जगात दहावा क्रमांक आहे.मराठी भाषेचा बाज आणि महत्त्व समजावून घेऊन आपण मराठीच्या विकासासाठी हातभार लावणे गरजेचे आहे.
सदर प्रसंगी प्रास्तविक प्राचार्य डॉ.विजय ठाणगे यांनी केले आहे त्यावेळी ते म्हणाले की,”आपण मराठी भाषेचे केवळ विद्यार्थी व अभ्यासक न राहता प्रचारक आणि प्रसारक देखील बनले पाहिजे.त्यासाठी आपल्याला भरपूर वाव असून आपण मातृभाषेबरोबरच इतर भाषांवर देखील प्रभुत्व मिळवून नोकरीच्या उत्तम संधी प्राप्त करू शकतो. छत्रपती संभाजी महाराजांचे अनेक भाषांवर प्रभुत्व होते.म्हणूनच तर एकीकडे तलवार गाजवितानाच त्यांनी ‘बुद्धभूषण’ सारखा महत्त्वपूर्ण ग्रंथ देखील लिहिला.
याप्रसंगी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त घेण्यात आलेल्या वक्तृत्व,काव्यवाचन आदी स्पर्धांचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.त्यामध्ये कु. मेघा सोनवणे,कु.मानसी उपाध्याय,कु.सायली जगताप,कु.कृष्णा दरगुडे,कु.स्वाती कोल्हे,कु.पायल गायकवाड,कु.कोमल केकाण,कु.समाधान वाव्हळ आदींचा समावेश होता.
सदर प्रसंगी कार्यक्रमाच्या प्रारंभी सूत्रसंचालन डॉ.संजय दवंगे यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ.महारुद्र खोसे यांनी मान आहे.