जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

…हे मुख्याध्यापक झाले सेवानिवृत्त !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्याच्या शिक्षण क्षेत्रात मकरंद कोऱ्हाळकर कुटुंबियांचा नावलौकिक असून क्रीडा स्पर्धासह कार्यक्रमांचे सुयोग्य नियोजन,कामाची आवड,क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक व विविध खेळ संघटनावरील त्यांचे योगदान उल्लेखनीय असल्याचे गौरवोद्गार श्रीमान गोकुळचंद विद्यालयाचे अध्यक्ष कैलास ठोळे यांनी नुकतेच एका प्रसंगी काढले आहे.


“मकरंद कोऱ्हाळकर यांचे शारीरिक शिक्षण क्षेत्रातील काम मोठे होते त्यांनी अनेक राज्यस्तरीय क्रीडा शिक्षक संघटनेत मोलाचे योगदान दिले असल्यामुळे त्यांना संघटनेचे तीन जिल्ह्याचे अध्यक्षपद प्राप्त झाले होते हा त्यांच्या कार्याचा गौरव होता”-अध्यक्ष शरदचंद्र धारूरकर.

   कोपरगाव येथील श्रीमान गोकुळ चंद माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक मकरंद कोऱ्हाळकर हे नुकतेच सेवानिवृत्त झाले असून त्यांचा गौरव समारंभ कलश मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.त्यावेळी ते बोलत होते.सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ पुणे येथिल अध्यक्ष शरदचंद्र धारूरकर होते.

   सदर प्रसंगी माजी नगराध्यक्ष संजय सातभाई,मनोज अग्रवाल,प्रसाद नाईक,काळे कारखान्याचे संचालक दिनार कुदळे,माजी नगराध्यक्षा ऐश्वर्यालक्ष्मी सातभाई,माजी नगराध्यक्ष आर.डी.सोनवणे,विदयार्थी सहाय्यक समितीचे हीरालाल महानुभाव,कोपरगाव वकील संघाचे माजी अध्यक्ष अॕड.जयंत जोशी,वनिता मंडळाच्या अध्यक्षा शैला लावर,सुनिता कोऱ्हाळकर,श्रीमती कुमुदिनी कोऱ्हाळकर,क्रीडा शिक्षक राजेंद्र कोहकडे,आनंद ठोळे,मुख्याध्यापक रमेश गायकवाड,माजी उपनगराध्यक्ष दत्तात्रय ठोंबरे आदि मान्यवर उपस्थित होते.

     सदर प्रसंगी प्रभारी गटशिक्षणाधिकारी शबाना शेख म्हणाल्या की,”एक विश्वासू जबाबदार मुख्याध्यापक व सहायक परीक्षक म्हणून मकरंद कोऱ्हाळकर यांचे काम कायम स्मरणात राहिल.तालुका गणित विज्ञान प्रदर्शनात त्यांचा झोकून देऊन प्रशासनाला सहकार्य करून काम करण्याचा स्वभाव होता.त्यांच्या सेवानिवृत्ती मूळे एक पोकळी निर्माण होणार आहे.त्यांची सामाजिक बांधिलकी व सेवा न संपणारी असून सतत काम करण्याच्या भावनेमुळे निवृत्तीनंतर ही ते कार्यरत राहतील असा विश्वास शेवटी व्यक्त केला आहे.

अध्यक्ष शरदचंद्र धारूरकर म्हणाले की,”मकरंद कोऱ्हाळकर यांचे शारीरिक शिक्षण क्षेत्रातील काम मोठे होते त्यांनी अनेक राज्यस्तरीय क्रीडा शिक्षक संघटनेत मोलाचे योगदान दिले असल्यामुळे त्यांना संघटनेचे तीन जिल्ह्याचे अध्यक्षपद प्राप्त झाले होते हा त्यांच्या कार्याचा गौरव होता असे गौरवोद्गार काढले आहे.

    सदर प्रसंगी नासिक पदवीधर मतदार संघाचे माजी आमदार डॉ.सुधीर तांबेसह विविध क्षेत्रातील मान्यवर,विविध संघटनांचे पदाधिकारी,कोपरगाव ब्राम्हण सभेचे कार्यकारिणी सदस्य पदाधिकारी,मित्र मंडळी आदींनी त्यांचा गौरव केला आहे.

  कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन क्रीडा व शारीरिक शिक्षण  शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अरुण चंद्रे यांनी केले तर  उपस्थितांचे आभार सोहम कोऱ्हाळकर यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close