शैक्षणिक
…या महाविद्यालयाचा बारावी निकाल जाहीर
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
पुणे विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी/मार्च २०२४ मध्ये घेतलेल्या इ.१२ वी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल लक्षवेधी लागला आहे.यशस्वी विद्यार्थांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला आहे.बोर्डाकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत निकालाची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.दुपारी एक वाजल्यापासून विद्यार्थ्यांना mahresult.nic.inया वेबसाईटवर निकाल ऑनलाईन पाहता येणार असल्याची माहिती आधीच जाहीर करण्यात आली होती.त्यात हा निकाल जाहीर झाला आहे.त्यात रोहमारे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी हे यश संपादित केले आहे.
दरम्यान जाहीर झालेल्या या निकालात विज्ञान शाखेत गाढे आर्यन नितीन ७३.१७ टक्के गुण मिळून प्रथम क्रमांक मिळवला आहे.बारे आदित्य योगेश ७२.३३ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे.याने गणित विषयात ९६ गुण मिळवले.कुमारी चांदगुडे श्रावणी सुनील ७०.६७ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.
वाणिज्य शाखेत वाघ गोकर्ण राजेंद्र ७६.६७ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला आहे.कुमारी वाघ रेणुका रवींद्र हिने ७६.१७ द्वितीय क्रमांक मिळवला आहे.तसेच कुमारी शिंदे अश्विनी संतोष ७५.१७ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.
दरम्यान यशस्वी विद्यार्थ्यांचे कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे,सचिव संजीव कुलकर्णी,चंद्रशेखर कुलकर्णी,संदीप रोहमारे,सुजित रोहमारे,प्राचार्य डॉ.बी.एस.यादव,सचिन चांदगुडे,मनेष गाडे,पंडितराव चांदगुडे डॉ.विकास जामदार,रामभाऊ गाढे,चासनळी महाविद्यालयाचे प्राचार्य बारे एन.जी.आदींनी अभिनंदन केले आहे.