जाहिरात-9423439946
शैक्षणिक

…या महाविद्यालयात करियर मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगांव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के.जे.सोमैया महाविद्यालयात रोटरी क्लब ऑफ कोपरगाव सेंट्रल व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या वतीने नुकतीच करियर मार्गदर्शन कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.

  

“वाणिज्य व व्यवस्थापन विद्या शाखेमध्ये शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य अत्यंत उज्वल असुन विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच विविध तंत्रे व कौशल्य आत्मसात केली पाहिजे”-डॉ.विकास मालकर,अध्यक्ष,मार्केटिंग विभाग,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,अभ्यास मंडळ.

सदर कार्यशाळेचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मार्केटिंग मॅनेजमेंट या अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ.विकास मालकर,रोटरी क्लब ऑफ कोपरगाव सेंट्रल’चे अध्यक्ष राकेश काले,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव आदि मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाले आहे.

   यावेळी डॉ.विकास मालकर यांनी,” वाणिज्य व व्यवस्थापन विद्या शाखेमध्ये शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य अत्यंत उज्वल असुन विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच विविध तंत्रे व कौशल्य आत्मसात केली पाहिजे” असे प्रतिपादन करुन त्यांनी रोजगार व स्वयंरोजगाराच्या अनेक संधी विद्यार्थ्यांना खुणावत असल्याचेही त्यांनी शेवटी नमुद केले आहे.

   दरम्यान ‘रोटरी क्लब ऑफ कोपरगाव सेंट्रल’चे अध्यक्ष राकेश काले यांनी रोटरी क्लब द्वारे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आयोजित करण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

   सदर प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव यांनी उपस्थितांचे स्वागत करतांना रोटरी क्लबच्या वतीने आयोजित या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासात निश्चित भर पडेल असा आशावाद शेवटी व्यक्त केला आहे.


   सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.महारुद्र खोसे यांनी तर आभार डॉ.वसुदेव साळुंके यांनी मानले आहे.सदर कार्यशाळेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close