जाहिरात-9423439946
शैक्षणिक

स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज-माहिती

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

  वर्तमान जग स्पर्धेचे झाले असून विद्यार्थ्यांना यश मिळवायचे असेल तर वाचन संस्कृती जोपासणे गरजेचे बनले असल्याचे प्रतिपादन सारथी एज्युकेशनचे संचालक राहुल मिसाळ यांनी नुकतेच कोपरगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“तरुणांना स्पर्धा परीक्षा यशस्वी होण्यासाठी गणित,इंग्लिश व बुद्धिमत्ता इत्यादी विषयांचा सखोल अभ्यास करण्याची आवश्यकता आहे”-राहुल मिसाळ,कक्ष व सारथी एज्युकेशन.


  कोपरगांव तालुका एज्युकेशन सोसायटीच्या के.जे.सोमैया महाविद्यालयात वाणिज्य विभाग,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र,स्टुडेन्ट मेंटॉरिंग समिती,अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व सारथी एज्युकेशन,छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बँकिंग क्षेत्रातील नोकरीच्या संधी’ या विषयावर एकदिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी प्रमुख पाहुणे ते म्हणून बोलत होते.

  

सदर प्रसंगी सारथी एज्युकेशनचे संचालक अक्षय शेळके,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव,गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा.डॉ.विजय ठाणगे,महाविद्यालयातील प्राध्यापक व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

  त्यावेळी पुढे बोलताना म्हणाले की,”आयबीपीएस’ सारख्या बँकिंग क्षेत्रातील स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासाची नितांत गरज असल्याचे आवाहन त्यांनी शेवटी केले आहे.

   चर्चासत्राच्या दुसऱ्या सत्रात राहुल मिसाळ यांनी स्पर्धा परीक्षेला सामोरे जाताना विद्यार्थ्यांनी विषयांची तयारी कशी केली पाहिजे याविषयी मार्गदर्शन करतांना चालू घडामोडी,गणित,इंग्लिश व बुद्धिमत्ता इत्यादी विषयांचा सखोल अभ्यास करण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे.महाविद्यालयीन युवक देशाचा आधारस्तंभ असून युवकांकडून अधिकाधिक स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादनाची इच्छाही त्यांनी शेवटी व्यक्त केली आहे.

   सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.संजय अरगडे यांनी केले तर वाणिज्य विभागप्रमुख प्रा.डॉ.संतोष पगारे यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले.तर सूत्रसंचालन डॉ.रवींद्र जाधव यांनी केले आहे.उपस्थितांचे आभार डॉ.वसुदेव साळुंके यांनी मानले आहे.

    सदर चर्चासत्र यशस्वीतेसाठी वाणिज्य विभागातील प्रा.मुकेश माळवदे,प्रा.अजित धनवटे,प्रा.सुनील गुंजाळ,प्रा.स्वागत रणधीर,प्रा.सोनाली आव्हाड यांनी विशेष परिश्रम घेतले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close