जाहिरात-9423439946
शैक्षणिक

‘कुणबी’ आरक्षणाच्या लाभ,इंजिनियरला जर्मनीत ५७ लाखांचे पॅकेज !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

  वर्तमानात आरक्षण हा कळीचा मुद्दा ठरला असून त्यावर राज्यात मोठमोठी आंदोलने होत आहे.मात्र याच आरक्षणाचा लाभ घेत कोपरगाव तालुक्यातील खिर्डी गणेश येथील तरुणाने यशाचे मोठे शिखर गाठले असून जर्मनी स्थित ‘अर्क इंजिनिअरिंग’ या या कंपनीत तब्बल ५७ लाखांचे पॅकेज पटकावले आहे.त्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

प्रत्येकाने पुढे जाण्यासाठी आणि जीवनात यश मिळवण्यासाठी उत्तम शिक्षण अत्यंत आवश्यक आहे.आपल्यामध्ये आत्मविश्वास वाढवण्याबरोबरच हे आपले व्यक्तिमत्व घडवण्यासही मदत करते.मात्र उच्च शिक्षण हे खर्चिक आणि सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे असल्याचे वारंवार सिद्ध होत आहे.त्यामुळे आरक्षणाचे महत्व वाढत चालले आहे.राज्यासह देशभर आरक्षण मागणी वाढत चालली आहे.त्या आरक्षणाचा लाभ नुकताच खिर्डी गणेश येथे उघड झाला आहे.

प्रत्येकाने पुढे जाण्यासाठी आणि जीवनात यश मिळवण्यासाठी उत्तम शिक्षण अत्यंत आवश्यक आहे.आपल्यामध्ये आत्मविश्वास वाढवण्याबरोबरच हे आपले व्यक्तिमत्व घडवण्यासही मदत करते.मात्र उच्च शिक्षण हे खर्चिक आणि सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे असल्याचे वारंवार सिद्ध होत आहे.त्यामुळे राज्यासह देशभर आरक्षण मागणी दिवसंदिवस वाढत चालली आहे.कारण आरक्षणाचे लाभ सामान्य नागरिकांना दिसत असून त्यांनाही त्यांचा हेवा वाटत आहे.त्यामुळेच या मागणीने जालन्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू झाले होते.ते सुरु असताना पोलिसांनी लाठीमार केला.यानंतर झालेल्या झटापटीत आंदोलक आणि पोलीसही जखमी झाले.या घटनेनंतर पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.राज्याचे मंत्री आणि शरद पवारांपासून उद्धव ठाकरेंपर्यंत सगळेच नेते जालन्यातील उपोषणस्थळी भेट देऊन,मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा किंवा सहानुभूती दर्शवत आहेत.मात्र,मराठा आरक्षणाचा किंवा कुठल्याही आरक्षणाचा मुद्दा हा विधिमंडळाच्या अख्त्यारितला प्रश्न नसून,न्यायालयीन कक्षेतला मुद्दा आहे आणि त्यासाठी मराठा आरक्षण समर्थकांनी न्यायालयीन लढाई सुद्धा लढलीय.मात्र,मराठा समाजाला आरक्षण मिळू शकलं नाहीय.मात्र आंदोलनकर्ते अद्याप त्यावर ठाम असल्याचे दिसून येत आहे.एक मात्र त्यामुळे उघड झाले असून आरक्षण वर्तमानात किती महत्वाचे ठरत आहे हे उघड झाले आहे.त्यामुळे मराठा समाजातील अनेक तरुण उच्च शिक्षणासापासून वंचित राहत आहेत.मात्र काही तरुणांना या आरक्षणाचा लाभ मिळाल्याने त्यांनी शिक्षणाची उंच शिखरे गाठले असल्याचे उघड झाले असल्याचा त्याच्या पालकांचा दावा आहे.असेच एक उदाहरण कोपरगाव तालुक्यातील खिर्डी गणेश येथील उघड झाले आहे.त्या तरुणांचे नाव आहे पवन भाऊसाहेब रोहोम.त्याचा नूकताच कोपरगावात सत्कार करण्यात आला आहे.त्याने आरक्षणाचा लाभ घेत उच्च शिक्षण घेत जर्मनीतील,’अर्क इंजिनिअरिंग’ या कंपनीत ग्रामीण भागात सर्वाधिक ५७ लाखांचे पॅकेज घेतले असल्याचा त्यांच्या नातेवाईंकांचा व समर्थकांचा दावा आहे.त्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

   कोपरगाव येथे ‘आम्ही जिजाऊंच्या लेकी’ या महिला संघटनेच्या वतीने व सकल मराठा समाजाच्या वतीने पवनचे आई-वडील भाऊसाहेब रोहोम व मंजुषा रोहोम यांचा सत्कार करण्यात आला आहे.

   सदर प्रसंगी राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते संदीप वर्पे,विमल पुंडे,दत्ता पुंडे,अनिल गायकवाड,विनय भगत,अमित आढाव,  जिजाऊंच्या लेकी या संघटनेच्या अध्यक्षा शिल्पा पुंडे,पुष्पाताई जगताप,उमा वहाडणे,रोहिणी पुंडे, प्रतिभा गायकवाड,सुवर्णा दर्पेल,कविता दरपेल,साक्षी भगत,साक्षी उगले,बिना भगत,निर्मला भगत,संगीता नरोडे,बेबी पुंडे , उर्मिला लोळगे,सुप्रिया निळेकर,अलका आव्हाड,शोभा सानप,संदिप पुंडे,अड्.सौरभ पुंडे,नरोडे पाटील,शांताबाई सानप,अलका आव्हाड आदीसह बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close