शैक्षणिक
…या विद्यालयाच्या प्रथम विद्यार्थिनीचा सन्मान !
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव येथील डॉ.सी.एम.मेहता कन्या विद्यालयाची स्थापना सन-१९६३ साली झाली आहे.त्यावेळीच्या विद्यालयाच्या प्रथम प्रवेशित विद्यार्थिनी,ज्यांचे नोंदणी पुस्तकात एक क्रमांकास नाव आहे आशा प्रमोदिनी देवळालीकर यांचा विद्यालयाच्या वतीने नुकताच सन्मान करण्यात आला आहे.
यावेळी विद्यालयाच्या प्राचार्या प्रमोदिनी शेलार,उपमुख्य्यापक रावसाहेब शिंदे,पर्यवेक्षक सुरेश सोनवणे,मेहबूब शेख,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष संदीप देवळालीकर,बाळासाहेब देवळालीकर,रुक्मिणीताई देवळालीकर,प्रतीक नागरे,विद्यालयातील सर्व सेवक व विद्यार्थिनी उपस्थितीत होते.
यावेळी प्रमोदिनी देवळालीकर यांनी विद्यालयास अकरा हजार रुपयांची देणगी दिली आहे.विद्यालयाच्या प्राचार्य प्रमोदिनी शेलार यांनी रयत गीत गाऊन त्यांचे स्वागत केले व विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.विद्यालयाच्या प्रथम विद्यार्थिनी प्रमोदिनी देवळालीकर यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना खूप शिकून जीवनात यशस्वी व्हा व संकटावर मात करा असे आवाहन उपस्थित विद्यार्थ्यांना केले आहे.
यावेळी नवोदय प्रवेश पात्र विद्यार्थिनी पवनी भोईर,श्रेया सुपेकर त्यांना मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक यांचा सन्मान प्रमोदिनी देवळालीकर यांच्या हस्ते करण्यात आला आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन किरण चांदगुडे व आभार अरुण बोरणारे यांनी मानले आहे.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले आहे.