जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

आगामी काळ कृत्रिम बुद्धिमत्तेचा- कुलकर्णी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

“गेल्या वीस वर्षात इतर क्षेत्राबरोबरच शिक्षण क्षेत्रात देखील झपाट्याने बदल झाले असून या बदलामागे आय.टी.या तंत्राची भूमिका महत्त्वाची ठरली आहे.उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये इंटरनेटचा वापर अपरिहार्य झाला आहे.आजचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे असून आता तर त्याही पुढे जाऊन कृत्रिम बुद्धिमत्तेचा विचार होऊ लागला असल्याचे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सी.आय.एन.एस.चे प्रमुख अंकुश कुलकर्णी यांनी येथे कोपरगाव येथे एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“आजकाल प्रत्येक क्षेत्रातील एखादी आवडणारी गोष्ट अंगीकारली जाते परंतु संशोधन क्षेत्रात असे केल्यास ती एक चोरी ठरते.त्यामुळे संशोधकांनी असे करणे टाळले पाहिजे.त्यासाठी या क्षेत्रातील तज्ञ अंकुश कुलकर्णी यांच्या व्याख्यानाचा संशोधकांना निश्चितच उपयोग होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो”-संदीप रोहमारे,विश्वस्त,कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटी,कोपरगाव.

कृत्रिम बुद्धिमत्ता हा विषय विज्ञानकथांमध्ये जास्त आढळत असला तरी,ही संगणक शास्त्रातील एक महत्त्वाची शाखा आहे.या शाखेमध्ये यंत्र शिक्षण त्यांचे बुद्धिमान वर्तन व परिस्थितीला जुळवून घेण्याची क्षमता आदींचा अभ्यास केला जातो.या शाखेतील संशोधन मुख्यत: स्वयंचलित कार्य करण्यासाठी आवश्यक असलेली बुद्धिमान वर्तणूक करू शकतील अशा यंत्रांशी निगडित आहे.अलीकडील काळात या विषयाला खूपच महत्व प्राप्त झाले असून या विषयी वि विद्यार्थ्यांत जागृती करण्यासाठी कोपरगाव येथील स्थानिक के.जे.सोमैया महाविद्यालयात ग्रंथालय विभाग आणि आय.क्यू.ए.सी.च्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित केली होती त्यावेळी ते बोलत होते.

सदर प्रसंगी संस्थेचे विश्वस्त संदीप रोहमारे,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव,कार्यशाळेच्या समन्वयक ग्रंथपाल प्रा.नीता शिंदे,महाविद्यालयातील संशोधन मार्गदर्शक प्रो.जे.एस.मोरे,प्रो.एस.आर.पगारे,डॉ.जी.के.चव्हाण डॉ.आर.डी.गवळी,डॉ.एस.बी.काळे,प्रो.बी.बी.भोसले,प्रो.के.एल.गिरमकर,डॉ.बी.डी.गव्हाणे,डॉ.एस.एम.देवरे आदी मान्यवर उपस्थित होते.

त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”वर्तमानात संशोधनाचा घसरता दर्जा सुधारण्यासाठी आय.टी.चा वापर होऊ लागला आणि प्लॅजेरिझम सारख्या नाविन्यपूर्ण सॉफ्टवेअरचा उदय झाला आहे.शोध प्रबंध जमा करण्यापूर्वी त्याचा दर्जा राखण्यासाठी विद्यापीठीय यंत्रणेमार्फत शोध प्रबंधाचे प्लॅजेरिझम करून घेणे अनिवार्य करण्यात आले. या सॉफ्टवेअरमुळे खऱ्या संशोधकांच्या ज्ञानाचा किंवा बौद्धिक संपदेचा अधिकार अबाधित राहिला असल्याचे त्यानीं शेवटी सांगितले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रास्ताविक करताना कार्यशाळेच्या समन्वयक ग्रंथपाल प्रा.नीता शिंदे यांनी केले आहे.तर उपस्थितांसमोर संदीप रोहमारे,डॉ.बी.एस.यादव यांनी मनोगत व्यक्त केले आहे.

यावेळी प्रा.शिंदे यांनी प्रमुख वक्त्यांचा परिचय देखील करून दिला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.शैलेंद्र बनसोडे यांनी तर उपस्थितांचे आभार प्रदर्शन डॉ.एन जी शिंदे यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close