शैक्षणिक
…या फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे जी-पॅट परीक्षेत यश
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
देशभरातील नामवंत फार्मसी इन्स्टिट्यूटमध्ये एम.फॉर्म.या पदव्युत्तर अभासक्रमांच्या प्रवेशासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सी तर्फे घेण्यात आलेल्या जी-पॅट या प्रवेश परीक्षेचा निकाल रविवारी २ जुलै रोजी जाहीर झाला असून यात राष्ट्रसंत जनार्दन स्वामी शैक्षणिक संकुलातील बी.फार्मसी अभ्यासक्रमातील अंतिम वर्षातील ३ विदयार्थ्यांनी जी-पॅट परीक्षेत लक्षवेधी यश संपादन केले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
कोपरगाव नजीक असलेल्या राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाविद्यालयातील विद्यार्थीनी कु.दिक्षा दुबे हिस ९२.५१% (ए.आय.आर.४७२१),विशाखा रणशुर हिस ८१.६८% (ए.आय.आर.९२५४) व साईश म्हस्के यास ७७.२६% (ए.आय.आर.१४२०८) गुण मिळवले आहेत.यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”जी-पॅट ही परीक्षा फार्मसी क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा आहे.कोपरगाव नजीक असलेल्या राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फार्मसी महाविद्यालय हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉनिकल विद्यापीठाशी संलग्न असून ‘बी.फार्मसी’ हा पदवी अभ्यासक्रम बारावी सायन्स नंतर चार वर्षे शिकवला जातो.
राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फार्मसी महाविद्यालयात नियमित तासिका,तज्ञांची व्याख्याने,ग्रंथालय व नियमित प्रयोगशाळा प्रात्याशिके यांमुळे विदयार्थ्यांचा मूलभूत सर्वांगीण विकास झाला असल्याचा दावा प्राचार्य डॉ.नितीन जैन यांनी केला आहे.व त्यामुळेच महाविद्यालयाची विद्यार्थीनी कु.दिक्षा दुबे हिस ९२.५१% (ए.आय.आर.४७२१),विशाखा रणशुर हिस ८१.६८% (ए.आय.आर.९२५४) व साईश म्हस्के यास ७७.२६% (ए.आय.आर.१४२०८) गुण मिळवले आहेत.
यशस्वी विद्यार्थ्यांना प्रा.दादासाहेब कवाडे यांनी जी-पॅट समन्वयक म्हणून मार्गदर्शन केले.संस्थेचे अध्यक्ष चांगदेव कातकडे,विश्वस्त प्रसाद कातकडे,विजय कडू,कोटमे सर तसेच प्राचार्य डॉ.नितिन जैन विभागप्रमुख उषा जैन,विजय जाधव,संदिप लावरे,सचिन आगलावे,सूरज बेंद्रे,करवीर आघाडे,सर्व प्राध्यापक वर्ग व इतर कर्मचारी आदींनी विदयार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.