शैक्षणिक
जवाहर नवोदय परीक्षेत…या संकुलाची यश परंपरा सिद्ध

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
जवाहर नवोदय परीक्षेचा निकाल नुकताच जाहिर झाला असून यामध्ये आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाच्या आत्मा मालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुलाच्या करण चारवंडे व शिवम वायखिंडे या दोन विद्यार्थ्यांची निवड झाली आहे त्यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
“सलग पंधराव्या वर्षी आत्मा मालिक सेमी इंग्लिश मिडियम गुरुकुलाच्या विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालयासाठी निवड झाली असून आजपर्यंत ७५ विद्यार्थ्यांची नवोदयसाठी निवड झाली आहे.अभ्यासक्रमाचे सुक्ष्म नियोजन,जादा वर्ग,नैदानिक चाचण्या,सराव चाचण्या,या शिवाय विद्यार्थी व शिक्षकांची मेहनत यामुळे हे लक्षवेधी यश मिळाले आहे”-निरंजन डांगे,प्राचार्य,आत्मा मालिक शैक्षणिक संकुल.
यशस्वी विद्यार्थ्यानां विभाग प्रमुख अनिल सोनवणे,सागर अहिरे,सचिन डांगे,रमेश कालेकर,रविंद्र देठे,मीना नरवडे, बाळकृष्ण दौंड,विषय शिक्षक अनिल सोनवणे,दिपक चौधरी,प्रियंका चौधरी,संतोश भांड,रुपाली चव्हाण यांचे मागदर्शन लाभले होते.
यशस्वी विद्यार्थ्यांचे आश्रमाचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी,सरचिटणीस हनुमंत भोंगळे,विश्वस्त प्रकाश भट,प्रकाश गिरमे,बाळासाहेब गोर्डे,प्राचार्य निरंजन डांगे,शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक,वसतिगृह व्यवस्थापक साईनाथ वर्पे आदिंनी अभिनंदन केले आहे.