निधन वार्ता
छायाचित्रकार गंगवाल यांना बंधू शोक
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील जैन समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते व कैलास फ्रेमचे संचालक सुभाष भाऊलाल गंगवाल (वय-७६) यांचे नुकतेच निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन बहिणी,दोन मुले असा परिवार आहे.त्यांच्यावर कोपरगाव येथील गोदावरी नदितीरी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.ते वृत्तपत्र छायाचित्रकार कैलास गंगवाल यांचे बंधू होते.
स्व.सुभाष गंगवाल हे अत्यंत धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाचे म्हणून कोपरगाव आणि परिवारात प्रसिद्ध होते.ते जुन्या काळातील फेटे बांधण्यात निष्णात गणले जात.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.ते प्रसिद्ध पत्रकार स्व.सि.बी.गंगवाल यांचे बंधू होते.पत्रकार गंगवाल यांचे निधनानंतर अल्पावधीतच त्यांच्या बंधूंचे निधन झाले आहे.