निधन वार्ता
कोपरगाव बाजार समितीचे माजी संचालक…यांचे निधन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक व कोपरगाव हमाल पंचायतचे माजी अध्यक्ष राधुजी मुरडनगर यांचे निधन झाले आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.त्याच्या पश्चात दोन नातू ,तीन नाती असा परिवार आहे.
स्व.राधुजी मुरडणर हे अत्यंत धार्मिक व मनमिळाऊ म्हणून प्रसिद्ध होते.त्यांचे माजी आ.अशोक काळे,आ.आशुतोष काळे यांचेशी जिव्हाळ्याचे संबंध होते.त्यांना बाजार समितीवर वीस वर्ष संचालक म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती.हमाल पंचायतीचे ते तह्यात अध्यक्ष होते.
त्याचा गांधीनगर भजनी मंडळाशी व गांधीनगर तरुण मंडळाशी अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते.त्यांच्यावर कोपरगाव येथील स्मशान भूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार झाले आहे.त्यांच्या निधनाबद्दल सहकार विभागाचे सहाय्यक निबंधक नामदेव ठोंबळ व बाजार समितीचे सचिव नानासाहेब रनशूर यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.