निधन वार्ता
अग्रवाल यांना मातृ शोक

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील सहकारी पतसंस्था चळवळीतील अग्रणी सहकारी पतसंस्था असलेल्या शुभम नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष मनोज अग्रवाल यांच्या मातोश्री कांताबाई कांतीलाल अग्रवाल (वय-७५) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात पती,दोन मुले,तीन मुली असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
स्व.कांताबाई अग्रवाल या अत्यंत धार्मिक व मनमिळाऊ म्हणून कोपरगाव व परिसरात प्रसिद्ध होत्या.त्यांच्यावर कोपरगाव शहरातील अमरधाम येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
सदर प्रसंगी राज्य पतसंस्थेचे अध्यक्ष ओम प्रकाश कोयटे,गोदावरी परजणे तालुका सहकारी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,व शहरातील मान्यवर बहु संख्येने उपस्थित होते.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.त्या प्रसिद्ध उद्योगपती कांतीलाल अग्रवाल यांच्या धर्मपत्नी होत्या.